Panchang 8th sept: या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१९ ते दु.०१:४६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
daily panchang
daily panchangsakal

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ८ सप्टेंबर २०२२ (daily panchang 08 sept 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १७ शके १९४४

आज सूर्योदय हा ०६:२४ वाजता तर सूर्यास्त १८:४० वाजता होणार. आज चंद्रोदय ही १७:२७ वाजता तर प्रात: संध्या ही स.०५:१४ ते स.०६:२४ दरम्यान असणार. आज सायं संध्या ही १८:४० ते १९:५१ दरम्यान असणार तर अपराण्हकाळ हा १३:४७ ते १६:१४ दरम्यान असणार. आज प्रदोषकाळ हा १८:४० ते २१:०१ दरम्यान असणार. आज निशीथ काळ हा २४:०९ ते २४:५६ दरम्यान असणार तर राहु काळ हा १४:०४ ते १५:३६ दरम्यान होणार तर यमघंट काळ हा ०६:२४ ते ०७:५७ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी ही त्रयोदशी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१९ ते दु.०१:४६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी वांगे खावू नये. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

daily panchang
Shravan 2022 : जालन्यातील पंचमुखी महादेव

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १२:३२ ते १४:०४

  • अमृत मुहूर्त - १४:०४ ते १५:३६

  • विजय मुहूर्त— १४:३६ ते १५:२५

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर. शनि मुखात आहुती १३:१० प.आहे. शिववास १९:३३ प.नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी १९:३३ प. शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - त्रयोदशी(१९:३३ प.नं. चतुर्दशी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - श्रवण(१३:१० प.नं.धनिष्ठा)

  • योग - अतिगंड(२२:२२ प.नं.सुकर्मा)

  • करण - कौलव(०८:४१ प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - मकर (२४:२६ नं.कुंभ)

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मीन

daily panchang
Panchang 7th sept : या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

विशेष:- प्रदोष व्रत, पंचक प्रारंभ २४:२६ नं.,रवियोग १३:१० नं. या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे. दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण करावे. ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशिंना रा.१२:२६ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com