Panchang 7th sept : या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३० ते दु.१२:०८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Aajache Panchang | Daily Panchang in Marathisakal

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ७ सप्टेंबर २०२२ (daily panchang update 7 september 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १६ शके १९४४

आज सूर्योदय ०६:२४ वाजता तर सूर्यास्त १८:४१ वाजता होणार. आज चंद्रोदयाची वेळ ही १६:३५ वाजता आहे. आज प्रात: संध्या ही स.०५:१४ ते स.०६:२४ दरम्यानची असणार. आज सायं संध्या ही १८:४१ ते १९:५२ दरम्यानची असणार. आज अपराण्हकाळ हा १३:४७ ते १६:१४ दरम्यानचा आहे. आज प्रदोषकाळ हा १८:४१ ते २१:०२ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:०९ ते २४:५६ दरम्यान असणार. आज राहु काळ हा १२:३२ ते १४:०५ दरम्यान असणार तर यमघंट काळ हा ०७:५६ ते ०९:२८ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी ही द्वादशी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३० ते दु.१२:०८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी मसूर खावू नये. या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Panchnag: आजच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १७:०९ ते १८:४१

  • अमृत मुहूर्त-- ०७:५६ ते ०९:२८

  • विजय मुहूर्त— १४:३६ ते १५:२५

पृथ्वीवर अग्निवास नाही. शनि मुखात आहुती आहे. शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - द्वादशी(२१:५० प.नं. त्रयोदशी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - उत्तराषाढा(१४:४४ प.नं.श्रवण)

  • योग - शोभन(२५:१८ प.नं.अतिगंड)

  • करण - बव(११:०२ प.नं. बालव)

  • चंद्र रास - मकर

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मीन

Aajache Panchang | Daily Panchang in Marathi
Panchang 6th sept : या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे

विशेष:- श्री वामन जयंती, दधिव्रत समाप्ती, दुग्ध व्रतारंभ, *श्री बुध जयंती

या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे. बुध कवच व विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रांचे पठण करावे. ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. श्री विष्णूंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com