Panchang
Panchang esakal

Panchnag: आजच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२० ते दु.०१:४९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Published on

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १ सप्टेंबर २०२२ ( Daily panchnag 1 september 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १० शके १९४४

आज सूर्योदय ०६:२२ वाजता तर सूर्यास्त १८:४६ वाजता होणार. आज चंद्रोदय १०:२९ वाजता तर प्रात: संध्याची वेळ ही स.०५:१४ ते स.०६:२२ दरम्यान आहे. आज सायं संध्या ही १८:४६ ते १९:५६ दरम्यान आहे तर अपराण्हकाळ हा १३:४९ ते १६:२० दरम्यान असणार.

आज प्रदोषकाळ हा १८:४६ ते २१:०५ दरम्यान असणार तर निशीथ काळ हा २४:१२ ते २४:५८ दरम्यान असणार. आज राहु काळ हा १४:०७ ते १५:४० दरम्यान असणार तर यमघंट काळ हा ०६:२३ ते ०७:५६ दरम्यान असणार.

आज श्राद्धतिथी ही षष्ठी श्राद्ध आहे. सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२० ते दु.०१:४९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल. या दिवशी फणस खावू नये. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

Panchang
Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवात होणार ६०० कोटींची उलाढाल

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त-- १२:३४ ते १४:०७

  • अमृत मुहूर्त-- १४:०७ ते १५:४०

  • विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३२

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर बुध मुखात आहुती आहे. शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - भाद्रपद

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - पंचमी(१२:३६ प.नं. षष्ठी)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - स्वाती(२३:०२ प.नं.विशाखा)

  • योग - ब्रह्मा(२१:११ प.नं.ऐंद्र)

  • करण - बालव(१२:३६ प.नं. कौलव)

  • चंद्र रास - तुळ

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मीन

Panchang
Ganeshotsav 2022: बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना मोदक, पेढ्यांशिवाय ५ हेल्दी पर्याय

विशेष:- ऋषिपंचमी, मध्यान्हकाळी सप्तर्षी पूजन(मध्यान्ह काळ स.११:१८ ते दु.०१:४७), श्री गजानन महाराज पु.ति(शेगाव), कलावती देवी जन्म, मच्छिंद्रनाथ जयंती

या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे. दत्तात्रेय सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा. गणपतीस उडीदवड्यांचा नैवेद्य दाखवावा. सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com