Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवात होणार ६०० कोटींची उलाढाल

ग्राहकांकडून पहिल्याच दिवशी बंपर खरेदी, बाजारात उत्साहाचे वातावरण
Ganesh Chaturthi 2022 600 crore turnover will happen in Ganeshotsav market gold silver electronics nagpur
Ganesh Chaturthi 2022 600 crore turnover will happen in Ganeshotsav market gold silver electronics nagpursakal

नागपूर : गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर बाजारात चैतन्य निर्माण झालेले आहे. या उत्सवाचे औचित्य साधत अनेकांनी खरेदीचा ‘प्लॅन'' केला आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, दुचाकी व चारचाकीसह सोने, फ्लॅट, प्लॉट, सजावटीचे साहित्य व लायटिंगचा समावेश आहे. पहिल्याच दिवशी अनेकांनी विविध वस्तूंची बंपर खरेदी केली. पुढील दहा दिवसांमध्ये अंदाजे ५५० ते ६०० कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सलग दोन वर्षे कोरोनाच्या छायेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार कमी झालेत. आरोग्यासाठीचाही खर्च वाढला. वाढत्या महागाईमुळे अनेकांचे बजेट बिघडले होते. कोरोनाचा काळ हा अतिशय दुःखद आणि आनंदावर विरजण घालणारा असल्याने अनेकांनी पैशाची बचत करण्यावर भर दिला आहे.

त्यामुळे मागील दोन वर्षे बाजारात हवी तशी उलाढाल झाली नाही. आता कोरोनाचे संकट कमी झालेले असून, रुग्णांची संख्याही घटली आहे. त्यामुळे निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सरकारनेही सर्वच निर्बंध मागे घेतले आहे. त्यामुळे बाजारात उत्साह व चैतन्य दिसत आहे. शहरातील इलेक्ट्रॉनिक्स, सोने, चारचाकी, दुचाकीच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केलेली आहे. बाजारात गेल्या तीन दिवसांपासून श्रींच्या खरेदीसह विविध साहित्यांच्या बुकिंगसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. आज मुहूर्त साधत अनेकांनी वस्तू घरी नेत खरेदीचा श्रीगणेशा केला, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा वस्तूंच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. तरीही ग्राहकांनी आपल्या खिशाचा विचार करून खरेदीवर भर दिलेला आहे. महाविद्यालये व कार्यालये नियमित सुरू झाले आहेत. त्यामुळे दुचाकीच्या विक्रीत विक्रमी वाढ होण्याची शक्यता इंद्रायणी टीव्हीएसचे संचालक विलास हरडे यांनी व्यक्त केली. सेमिकंडक्टरची अडचण असल्याने चारचाकीच्या विक्रीत घसरण झाली होती. आता ती अडचण दूर झाल्याने चारचाकी वाहनांच्या विक्रीतही मोठी वाढ झालेली आहे.

सोने-चांदीच्या विक्रीत वाढ

सोने आणि चांदीच्या विक्रीतही गणेशोत्सवाच्या निमित्ताने वाढ झालेली आहे. गणेशोत्सवात पूजेचे साहित्य आणि मूर्तीला चांदीचे अलंकार वाहण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सराफा व्यवसायात चांदीच्या विक्रीत तिप्पट ते चौपट वाढ झाली आहे. वाढलेल्या मागणीमुळे चांदीच्या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने चांदीला गणेशोत्सवात सोन्याची झळाळी आली असल्याचे रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी सांगितले.

दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा प्रथमच गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात उत्साह संचारला असून, व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी मालाची जमवाजमव केलेली आहे. त्यामुळे यंदा दहा दिवसांच्या कालावधीत अंदाजे ६०० कोटीची उलाढाल होईल, अशी अपेक्षा आहे.

-दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज ॲण्ड ट्रेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com