
१४ डिसेंबर रोजी दत्त सांप्रदायातील महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी दत्त जन्मकाळ सोहळा पार पडणार आहे. दत्त भगवानांना मानणाऱ्या भक्तांसाठी हा दिवस खास आहे. दत्त जयंतीचे पुराणातही विशेष महत्त्व आहे. दत्त जयंतीदिवशी भक्त दत्तांच्या चरणी लीन होतात.
चुकलेल्या भक्ताला वाट दाखवण्याचं काम गुरू करतो. आणि दत्त महाराजांना गुरू मानले जाते. कारण ते साक्षात दत्तगुरू आहेत. प्रत्येक भक्ताला जगण्याची कला अन् जीवनाचा अर्थ गुरूंनी समजावून सांगितला. दत्त गुरूंची अनेक मंदिरे भारतभर आहेत. त्यापैकी २४ स्थाने अशी आहेत ज्यांची परिक्रमा पूर्ण करण्याला महत्त्व आहे. (Datta Jayanti 2024)