आज मोठ्या उत्साहात दत्तगुरूंची जयंती साजरी की जात आहे. देशभरात हा सोहळा मोठ्या भक्तीभावात संपन्न होतो. दत्त महाराजांची मंदिरे देशभर पसरली आहे. दक्षिणेकडील अनेक राज्यांत दत्त भक्त दिसून येतात. काही मंदिरे नव्याने साकारलेली दिसतात तर काही मंदिरांना प्राचीन इतिहास आहे. असेच एक मंदिर भारतात आहे ज्याचा संबंध थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेला आहे.
होय, आपल्या देशात असे एक मंदिर आहे, जिथे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तव्य केलं होतं. तसं तर महाराजांनी अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला, तिथे वास्तव्य केलं होतं. पण हे मंदिर आणि इथे असलेलं छ.शिवाजी महाराजांचे वास्तव्य विशेष होतं. कारण, या दत्त मंदिरात महाराज साधू बनून राहिले होते. (Datta Jayanti )