
Datta Jayanti 2024: हिंदू धर्मात दत्त जयंतीला खास महत्व आहे. भगवान दत्तात्रेय हे ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एक भाग आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान दत्तांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला. यांना गुरूचे रूप मानले जाते. तसेच त्यांना श्री गुरूदेवदत्त देखील म्हणून ओलखले जाते.
यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा 14 डिसेंबर रोजी 04:58 वाजता सुरू होत आहे आणि 15 डिसेंबर रोजी दुपारी 02:31 वाजता समाप्त होईल. त्यामुळे या वर्षी 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जात आहे. आजच्या शुभ दिवशी काय करावे आणि काय करणे टाळावे हे जाणून घेऊया.