

Datta Jayanti 2025 Wishes
Sakal
Datta Jayanti 2025 devotional wishes for family: दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’… या गजरात वातावरण दत्तमय होऊन जाते. दत्त जयंती हा भक्तांसाठी विशेष दिवस मानला जातो. भगवान दत्तात्रेयांच्या कृपेची अनुभूती मिळवण्यासाठी या दिवशी दर्शन, नामस्मरण, जप, व्रत आणि सेवेत भक्त मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. नातेवाईक, मित्रपरिवार आणि जवळच्या व्यक्तींना भक्तीमयी शुभेच्छा देऊन या दिवसाचे पावित्र्य अधिक वाढवता येते. यंदा ४ डिसेंबरला दत्त जयंती साजरी केली जात आहे. हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी पुढील भक्तीमय संदेश पाठवू शकता.