December 2026 horoscope
esakal
नोव्हेंबर महिना आता संपत आला असून, लवकरच २०२६ चा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा मानला जात आहे. कारण डिसेंबरमध्ये काही प्रमुख ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहेत. ५ डिसेंबरला राहू-केतू राशी परिवर्तन करतील, तर ११ डिसेंबरला शनी मार्गी होणार आहेत. या ग्रहांच्या बदलांचा परिणाम सर्व राशींवर होईल, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं.