वर्षाचा शेवट होणार गोड! डिसेंबरमध्ये सूर्य-गुरुचा नवपंचम राजयोग, ४ राशींचं नशीब चमकणार, नोकरी-पैशांत होणार मोठी प्रगती

December 2026 Sun-Jupiter Navpancham Rajyog : सूर्य हा आत्मविश्वास, मान-सन्मान आणि नेतृत्वाचा कारक मानला जातो, तर गुरूचा संबंध ज्ञान, शिक्षण, धन आणि भाग्याशी जोडला जातो.
Sun Jupiter Navpancham Rajyog

Sun Jupiter Navpancham Rajyog

esakal

Updated on: 

२०२६ वर्षाचा शेवटचा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. डिसेंबरमध्ये अनेक ग्रहांच्या स्थितीत बदल होणार असून, त्याचा परिणाम काही राशींवर विशेष होण्याची शक्यता आहे. १६ डिसेंबरला सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. तर १३ डिसेंबरपासून देवगुरू बृहस्पती सिंह राशीत वक्री होणार आहेत. या दोन्ही ग्रहांमध्ये पंचम-नवम स्थानांचा संबंध तयार होणार असून, त्याला ज्योतिषशास्त्रात नवपंचम राजयोग म्हटलं जातं. सूर्य हा आत्मविश्वास, मान-सन्मान आणि नेतृत्वाचा कारक मानला जातो, तर गुरूचा संबंध ज्ञान, शिक्षण, धन आणि भाग्याशी जोडला जातो. त्यामुळे या ग्रहस्थितीचा फायदा मेष, सिंह, धनु आणि वृश्चिक राशीच्या लोकांना मिळण्याचे संकेत आहेत.

Loading content, please wait...