आज दीप अमावस्या; व्रत- वैकल्यांचा श्रावण मास उद्यापासून, असे आहे सण- उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deep Amavasya today Shravan month starts from tomorrow festival in this Shravan month

आज दीप अमावस्या; व्रत- वैकल्यांचा श्रावण मास उद्यापासून, असे आहे सण- उत्सव

जळगाव : व्रत- वैकल्यांचा व हिंदू धर्मियांमध्ये पवित्र मानला जाणारा श्रावण महिना शुक्रवार (ता. २९) पासून सुरू होतोय. पुढचे तीस दिवस सण- उत्सवांची रेलचेल असेल. श्रावणानंतरच्या भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाचे वेधही आतापासूनच लागले आहेत. हिंदू धर्मियांमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. या मासानिमित्त महिनाभर उपवास, व्रत करणारे भाविक लाखोंच्या संख्येने आहेत. श्रावणातील सर्व तीसही दिवसांना आपल्या संस्कृतीत वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक तिथीला सण- उत्सव, व्रताचे औचित्य असते. त्यातच पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली असल्याने एक वेगळे चैतन्य व भक्तिमय वातावरण निर्माण झालेले असते.

शिवाय महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी गुरुवारी (ता. २८) दिव्यांचे महत्त्व असलेली आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आहे.

असे आहे सण- उत्सव

२८ जुलै : श्रावण मासारंभ

१ ऑगस्ट : पहिला श्रावण सोमवार

२ ऑगस्ट : नागपंचमी

८ ऑगस्ट : दुसरा श्रावण सोमवार

११ ऑगस्ट : नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन

१५ ऑगस्ट : स्वातंत्र्यदिन (राष्ट्रीय उत्सव), तिसरा श्रावण सोमवार

१६ ऑगस्ट : पतेती (पारशी नूतन वर्षारंभ)

१८ ऑगस्ट : श्रीकृष्ण जन्माष्टमी

१९ ऑगस्ट : गोपाळकाला (दहीहंडी उत्सव)

२२ ऑगस्ट : चौथा श्रावण सोमवार

२६ ऑगस्ट : पोळा (श्रावण अमावस्या)

Web Title: Deep Amavasya Today Shravan Month Starts From Tomorrow Festival In This Shravan Month

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top