

Dev Diwali 2025 Date
sakal
प्रत्येक वर्षी मुख्य दिवाळी संपल्यानंतर, कार्तिक महिन्यात देव दिवाळी साजरी केली जाते, ज्याला देव दीपावली असेही म्हणतात. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला ही दिवाळी साजरी होते. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते आणि गंगेच्या घाटावर दीपदान केले जाते, ज्यामुळे संपूर्ण वातावरण उजळते. काशीतील प्रत्येक घाट लाखो दिव्यांनी सजवला जातो, म्हणूनच याला देव दीपावली म्हणतात. मात्र, यंदा देव दिवाळी नेमकी ४ नोव्हेंबरला आहे की ५ नोव्हेंबरला, याबद्दल अनेकांना शंका आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊया.