Dhanteras 2022: धनत्रयोदशीला यम देवाच्या नावाने दिवा लावतात,जाणून घ्या कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanteras 2022

Dhanteras 2022: धनत्रयोदशीला यम देवतेच्या नावाने दिवा का लावतात,जाणून घ्या कारण

पौराणिक काळापासून धनत्रयोदशीच्या दिवशी यम देवतेसाठी दिवा लावला जातो. आपण आपल्या घरी देखील आईला असा दिवा लावताना बघितले असेलच; पण धनत्रयोदशीच्या दिवशी यम देवतेसाठी का दिवा लावावा? या दिवशी यमाच्या नावाने दिवा लावल्याने अकाली मृत्यूचा धोका टळतो, असे मानले जाते.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला ‘हे’ उपाय करा; नशीब होईल धन-धना-धन

हिंदू धर्मात धनत्रयोदशी सणाला खूप महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यात कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. पंचांगानुसार यावर्षी धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरला येत आहे. या दिवशी छोटी दिवाळीही साजरी केली जाते आणि या दिवशी कुबेराची आणि खास करून धन्वंतरीची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी यमराजाच्या नावाने दिवा लावणे अनिवार्य आहे असे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीला कुबेर देवासह यम देवासाठी दिवा लावला जातो.

हेही वाचा: Dhanteras 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' गोष्टी करा; घरात आपोआप लक्ष्मी नांदेल

पौराणिक कथेनुसार, एकदा यमराजांनी आपल्या दूतांना विचारले की इतरांचे प्राण घेतांना त्यांना कधी दया नाही आली का? एका दूताने जरा घाबरलेल्या स्वरात बोलला, नाही महाराज! त्यावर यमराजाने नीट सांग मी तुला अभय दिले आहे असे म्हटले.

हेही वाचा: Dhanteras 2020: जाणून घ्या धनत्रयोदशी दिवशी काय खरेदी करावे, काय नको?

तेव्हा त्या दुताने समोर येत सांगितले की, एकाचा जीव घेताना त्यांचे मन खरोखरच घाबरले होते. एकदा हंस नावाचा राजा शिकारीसाठी दुसऱ्या राज्यात गेला होता. त्या राज्याच्या राजा हेमाने त्या राजाचे आदरातिथ्य केले. त्याच दिवशी राजाच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला होता. ज्योतिषांनी नक्षत्राच्या गणनेच्या आधारे सांगितले की ते मूल त्याच्या लग्नानंतर चार दिवसांनी मरेल. हे ऐकून राजाने त्या मुलाला ब्रह्मचारी म्हणून यमुनेच्या काठावरील गुहेत सोडून दिले आणि आपल्या प्रजेला त्याच्यावर कोणत्याही स्त्रीची सावली पडणार नाही यासाठी लक्ष ठेवण्यास सांगितले.

हेही वाचा: Dhanteras 2020 pooja Time : जाणून घ्या, तुमच्या शहरातील धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त

काही काळानंतर एके दिवशी एक तरुणी यमुनेच्या तीरावर गेली आणि त्या ब्रह्मचारी मुलाशी तिने गांधर्व विवाह केला. लग्नानंतर चौथ्या दिवशी राजकुमाराचा मृत्यू झाला. त्यानंतर तो दूत म्हणाला की महाराज, अशी जोडी आपण कधीच पाहिली नव्हती आणि त्या स्त्रीचा विलाप पाहून आपले मन भरून आले.

हेही वाचा: Diwali Festival 2022 : रंगबिरंगी आकाशकंदीलाने बाजारपेठ उजळली

या घटनेनंतर यमराज म्हणाले की, त्रयोदशीच्या दिवशी विधिवत पूजा करून दीपदान केल्यास अकाली मृत्यूचा धोका टळतो. ज्या घरात धनत्रयोदशीच्या दिवशी यम देवाच्या नावाने दिवा लावला जातो, त्या घरात अकाली मृत्यूची भीती नसते. तेव्हापासून धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदानाची परंपरा सुरू असल्याचे मानले जाते.

हेही वाचा: Diwali Festival 2022 : रंगबिरंगी आकाशकंदीलाने बाजारपेठ उजळली

धनत्रयोदशीच्या दिवशी यम देवाच्या नावाने दक्षिण दिशेला दिवा लावावा. या दिवशी पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेला ठेवला जातो.त्यावेळी 'मृत्युनाम दंडपाशाभयम् कालेन श्यामया सह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजः प्रियतम मम' या मंत्राचा जप केला जातो.