
Dhantrayodashi
Sakal
धनत्रयोदशीमध्ये आर्थिक समृद्धीसाठी मिठाशी संबंधित उपायांचा उल्लेख आहे. भगवान धन्वंतरींच्या पूजेसह सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, मिठाची देवाणघेवाण टाळावी आणि मीठ खरेदी करावी. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात.
Dhanteras 2025 sweet remedies for financial prosperity: यंदा धनत्रयोदशी 18 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यात धनत्रयोदशी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि धन्वंतरीची पूजा केली जाते. तसेच या दिवशी शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करतात. ज्योतिषशास्त्रात या दिवशी काही खास उपाय करण्यास सांगितले आहे. या उपयांमुळे आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार मीठाचे पुढील उपाय केल्यास घरात सुख-समृद्धी लाभते.