धनत्रयोदशीला चंद्र-शुक्राची युती; ५ राशींचं नशीब चमकणार, धनलाभासह नोकरीतही मोठी संधी

Dhanteras 2026 Horoscope : धनत्रयोदशीला कन्या राशीत चंद्र आणि शुक्राची युती होत आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार, या ग्रहस्थितीमुळे वृषभ, कन्या, वृश्चिक, धनु आणि मकर राशींच्या आर्थिक आणि करिअरविषयक बाबींमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.
Dhanteras 2026 Horoscope

Dhanteras 2026 Horoscope

esakal

Updated on: 

यंदा ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी कन्या राशीत चंद्र आणि शुक्राची युती होत आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार, चंद्राला मन, सुख आणि भावनांचा कारक मानलं जातं, तर शुक्र हा धन, ऐश्वर्य आणि भौतिक सुखांचा कारक आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या युतीचा काही राशींना फायदा होण्याची शक्यता आहे. विशेषतः वृषभ, कन्या, वृश्चिक, धनु आणि मकर या पाच राशींसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत.

Loading content, please wait...