Dharma : माळ जपताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, तरच तुमची मनोकामना पूर्ण होतील

ईश्वराला प्रार्थना करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यापैकी एक म्हणजे देवाचे नाव घेऊन माळे जप आहे.
Chanting Mantras Cautions
Chanting Mantras CautionsEsakal
Updated on

माळेचा जप : ईश्वराला प्रार्थना करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यापैकी एक म्हणजे देवाचे नाव घेऊन माळे जप आहे. ही माळेचा जप करायची पद्धत फार जुनी आहे. माळेचा जप केल्याने माणसांचे चित्त लगेच एकाग्र होऊन माणुस ईश्वर भक्तीत तलिन होतो. आपल्या धर्मशास्त्रात माळेचा जप करण्याचे अनेक नियम सांगितले आहेत. ते नियम नेमके कोणते आहेत याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

Chanting Mantras Cautions: प्राचीन काळापासून माळेचा जप करणे हा उपासना पद्धतीचा अविभाज्य भाग आहे. जप म्हणजे पुनरावृत्ती. जप करण्यासाठी माळेची आवश्यक आहे. नामजप करताना माळ मोजण्यासाठी उपयुक्त असतेच पण त्याच बरोबर माळेत एक अनोखे देवत्व सुध्दा असतं. माळेचा जप करताना कोणती खबरदारी घ्यावी? नेमकी कोणती माळ जपण्यासाठी निवडावी? या सगळ्या प्रश्नाची उकल या लेखातून होणार आहे.

Chanting Mantras Cautions
Ganeshotsav 2022 : गणेशाची मूर्ती निवताना चुकूनही उजव्या सोंडेची घेऊ नका; नाहीतर...

जप करण्यासाठी नेमकी कोणती माळ निवडावी?

माळेचे अनेक प्रकार आहेत. रुद्राक्ष माळ, तुळशी माळ, वैजयंती माळ, स्फटिक माळ, मोत्यांची माळ किंवा रत्नांची माळ असे माळांचे प्रकार आहेत. यापैकी रुद्राक्षाची माळ ही जपासाठी सर्वोत्तम मानली जाते. कारण या रूद्राक्षाच्या माळीचि थेट संबंध रुद्राशी म्हणजेच भगवान शिवसोबत आहे.

माळेमध्ये मण्यांची संख्या किती असावी?

माळेमध्ये मण्यांची संख्या कमीत कमी 27 किंवा जास्तीत जास्त 108 असावी, प्रत्येक मण्यानंतर एक गाठ असणे आवश्यक आहे. आपण करत असलेल्या मंत्रोच्चारांची संख्या मोजता यावी आणि नामजप करताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून माळेत मण्यांच्या संख्येला महत्त्व असते. माळेत 108 मणी असतात याचे महत्त्व असे आहे की, ज्योतिष शास्त्रात 27 नक्षत्रे आहेत आणि प्रत्येक नक्षत्रात 4 चरण आहेत. त्यांची संख्या 108 वर येते, जो पवित्र क्रमांक मानला जातो.108 मणी असण्याचे दुसरे महत्त्व असे आहे की विश्वाची 12 भागांमध्ये विभागणी झाली आहे. अशाप्रकारे 12 राशी आणि 9 ग्रहांचा गुणाकार 108 वर येतो, म्हणजेच 108 हा अंक अतिशय शुभ आणि दैवी आहे.

Chanting Mantras Cautions
Ganeshotsav 2022 : गणेशमूर्तीवर झळकणार रंगीत वस्त्र

माळ जपताना मेरू पार करु नये.

मालेच्या वरच्या भागात फुलासारखा आकार असतो त्याला 'मेरू' म्हणतात. त्याला विशेष महत्त्व आहे. माळाचा जपाची मोजणी मेरूपासून सुरू करावी लागेल आणि पुन्हा मेरूवर आल्यानंतर थांबवावी लागते, म्हणजेच 108 चे चक्र पूर्ण झाले आहे. मेरू कपाळावर लावा, ते ब्रह्मदेवाचे रूप आहे. त्यामुळे असे मानले जाते की मेरूचे विश्वात सर्वोच्च स्थान आहे. जपमाळ जपताना मेरू ओलांडू नये आणि जपमाळ पूर्ण झाल्यावर, आपल्या प्रमुख देवतेचे स्मरण करा.


माळ जपताना काय काळजी नक्की घ्यावी?

जेव्हा तुम्ही माळ जपता तेव्हा माळ कापडाने झाकून घ्यावी जेणेकरून फिरणाऱ्या माळ कोणाला दिसू नये. याशिवाय तुम्ही गोमुखीही वापर करू शकता. माळ जपतांना मंत्राचा जप खूप लवकर किंवा खूप हळू करू नये. माळेचा जप करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे. माळेचा जप करताना नेहमी आसनावर बसावे, आपला जमिनीला सरळ स्पर्श होता कामा नये.

माळेचा जप करण्यापूर्वी हातात माळ घेऊन प्रार्थना करावी जेणेकरून केलेला जप सफल होईल. माळ नेहमी आपलीच असावी. दुसऱ्याची माळेवर जप वापरू नका. ज्या माळाने तुम्ही मंत्राचा जप कराल ती माळ गळ्यात घालू नये. नामजप करताना भगवंत, रूप, लीला आणि धाम या चार नावांपैकी कोणत्याही एका नावाचे चिंतन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com