Ganeshotsav 2022 : गणेशाची मूर्ती निवताना चुकूनही उजव्या सोंडेची घेऊ नका; नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

worship of ganapati

Ganeshotsav 2022 : गणेशाची मूर्ती निवताना चुकूनही उजव्या सोंडेची घेऊ नका; नाहीतर...

यंदा ऑगस्टच्या अखेरला गणरायाचे आगमन होत आहे. सध्या गणरायाच्या आगमनासाठी गणेशभक्त आतूर झाले आहेत. गणराया येणार असल्याने त्याच्या आवडत्या वस्तुंसह बाजारपेठा सजल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सण साजरे करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा केला. दरम्यान, यंदा ऑगस्टच्या या काळात मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे.

कोणती मूर्ती घ्यावी, ती कशी असावी असे अनेक प्रश्न गणेश मूर्ती घेण्यासाठी गेलेल्यांना पडत असतील. अनेक गणेशभक्तांच्या मनात गणपतीच कोणत्या प्रकारची मूर्ती घ्यावी याबाबत संभ्रम असतो. गणेशमूर्ती ही प्रामुख्याने दोन प्रकारची असते. एक डाव्या सोंडेचा गणपती (Left Trunk Ganpati) आणि एक उजव्या सोंडेचा गणपती. (Right Trunk Ganpati.) गणपतीची कोणत्या प्रकारची मूर्ती घ्यावी याबाबत आपल्या मनात असलेला संभ्रम दूर होण्यासाठी ही बातमी मदत करेल.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : घरगुती गणेशाच्या सजावटीसाठी काही खास आयडिया

गणपतीच बाप्पांच्या आगमनाचे वेध खरे तर आधी दोन ते तीन महिने लागलेले असतात. विविध आकारातील, रुपातील गणेश मूर्ती बाजारात यायला सुरुवात झाली आहे. यातील काही मूर्ती या डाव्या सोंडेच्या असतात तर, काही मूर्ती उजव्या सोंडेच्या असतात. आता गणेश मूर्तीची सोंड उजव्या बाजूस असावी की डाव्या याबाबत अनेक मतमतांतरे असतात. गणपती मूर्तीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक डाव्या सोंडेचा गणपती, एक उजव्या बाजूचा गणपती. जाणून घ्या गणपती सोंडेबद्दल काही माहिती.

उजव्या सोंडेचा गणपती

उजव्या सोंडेचा गणपती याचाच अर्थ दक्षिणाभिमुख मूर्ती होय. दक्षिण याचा अर्थ असा की उजवी बाजू किंवा दक्षिण दिशा. ही दिशा यमलोकाकडे नेणारी, तर उजवी बाजू सूर्यनाडीची असल्याचे गणपती पुरानाचे अभ्यासक सांगतात. यमलोकाच्या दिशेला तोंड देण्याची ताकद या गणपती मध्ये असते. त्याचू सूर्यनाडी सुरु असल्याने तो तेजस्वीही असतो. असे सांगतात की दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप-पुण्याची छाननी केली जाते. त्यामुळे ही बाजू नकोशी असते. महत्त्वाचे म्हणजे दक्षिणाभिमुख गणपतीची पूजा नेहमी केली जात नाही. तसेच, या गणपतीची पुजा करताना पूजाविधीचे सर्व नियम काटेकोर पाळले जातील. तसेच, त्यात कोणताही बाधा येणार नाही याकडे कटाक्षाने पाहिले जाते.

डाव्या सोंडेचा गणपती

डाव्या सोंडेच्या गणपतीस वाममुखी गणपती असेही म्हटले जाते. वाम याचाच अर्थ डावी दिशा किंवा उत्तर बाजू. डावी बाजू ही उचव्या बाजूच्या विरुद्ध दिशेस येते. डाव्या बाजूला चंद्रनाडी असते. ती शीतलता देते. उत्तर बाजू ही अध्यात्माला पूरक असते असे मानतात. त्यामुळेच वाममुखी गणपती पूजेसाठी ठेवण्यास प्राधान्य असते. या गणपतीची मात्र नियमीत पूजा केली जाते.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : गणपतीला नैवेद्यासाठी तयार करा स्पेशल श्रीखंड, पाहा रेसिपी

(टीप : वरील लेखाचा उद्देश केवळ माहिती देणे असा आहे. या लेखाच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही प्रकारे दावा अथवा अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही. वाचकांनी, गणेश भक्तांनी वरील माहिती वाचून कृती करण्यापूर्वी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगत सदसदविवेकबुद्धीचा वापर करावा. मूर्तीची प्रतिष्ठापणा तज्ज्ञ आणि अभ्यासकांचा सल्ला जरुर घ्यावा.)

Web Title: Ganeshotsav 2022 Ganesha Trunk Bend On Left Or Right Side How To Choose Suitable Idol

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..