Diwali Bhaubeej 2022 : जाणून घ्या भाऊबीजेला बहिणीने भावाला औक्षण कसे करावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhaubeej 2022

Diwali Bhaubeej 2022 : जाणून घ्या भाऊबीजेला बहिणीने भावाला औक्षण कसे करावे

Diwali Bhaubeej 2022 : भाऊबीज हा दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा सण. या दिवाशी बहिण आपल्या भावाच्या दिर्घायुसाठी औक्षण करते. आपल्या संस्कृतीमध्ये कोणतेही सण धार्मिक विधीशिवाय पूर्ण होत नाहीत. भाऊबीजेला बहिणीने भावाला कशा रितीने औक्षण करावे व त्यासाठी काय तयारी करावी ते जाणून घेऊया.

हेही वाचा: Bhaubij 2022 : भावाला ओवाळताना 'हे' म्हणायचं विसरू नका

* भाऊबीजेला बहिणीने भावाचेऔक्षण करण्यासाठी पुजेचे ताट तयार करावे. त्यात कुंकू, हळद, अक्षता, नाण, सोनं, सुपारी, नारळ, दिवा, मिठाई ठेवावी.

* भावाला औक्षणापुर्वी चौरंगावर किंवा पाटावर पुर्व पश्चिम बसवावे. या चौरंग किंवा पाटावर लाल आसन टाकावे त्यावर तांदळाची आरासही काढू शकता.

* भावाला चौरंगावर बसवून बहिणीने सर्वप्रथम भावाच्या कपाळी लाल कुंकवाचा टिळा लावावा. माथी कुंकवाचा टिळा लावणं हे दिर्घायु सोबतच प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं.

* कपाळी टिळा लावल्यानंतर डोक्यावर अक्षता टाकाव्या.

अक्षता म्हणजे औक्षवंत! दिर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षता टाकल्या जातात. अखंड आहेत अशा अक्षता पुजेच्या ताटात असाव्या. केलेलं पूजन देखील अक्षतांप्रमाणे पूर्ण असावे हा त्यामागील अर्थ आहे.

हेही वाचा: Diwali 2022 : भाऊबीज साजरी करण्यामागचं धार्मिक कारण जाणून घ्या

* यानंतर भावाला सुपारी, सुपारी, सोन्याच्या एखादा दागिन्याने ओवाळावे. यासह ताटातील दिव्याने भावाची आरती ओवाळून औक्षण पुर्ण करावे. औक्षण पुर्ण केल्यानंतर भावाला गोड मिठाई खाऊ घालावी.

भावांनी लक्षात ठेवा!

औक्षणानंतर भावांनी बहिणींना भेटवस्तू द्याव्यात आणि त्यांचे नेहमी रक्षण करण्याचे वचन द्यावे.

हेही वाचा: Bhaubij 2022 : बहिणींनो, भाऊबीजेला करू नका या चुका, नाहितर...

टॅग्स :Diwali FestivalDiwali