Diwali 2022: भाऊबीज साजरी करण्यामागचं धार्मिक कारण जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali 2022 : भाऊबीज साजरी करण्यामागचं धार्मिक कारण जाणून घ्या

Diwali 2022 : भाऊबीज साजरी करण्यामागचं धार्मिक कारण जाणून घ्या

भाऊबीजेच्या दिवशी सर्वच बायका आपल्या भावाच औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी भाऊ आपल्या बहिणींच्या घरी जाऊन त्यांच्याकडून औक्षण करवून घेऊन त्यांना भेटवस्तू देतात आणि त्यांचं रक्षण करण्याचं वचन देतात. भाऊबीज साजरी करण्यामागे एक धार्मिक कारण आहे. ते असे की याच दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनाला हे वचन दिलं होत.

हेही वाचा: Diwali Festival 2022 : ज्वेलरीची चमक अन्‌ मिठाईचा गोडवा

भाऊबीजेची पूर्ण कथा

भगवान सूर्यनारायण यांच्या पत्नीचे नाव छाया होते. त्यांच्या पोटी यमराज आणि यमुना यांचा जन्म झाला. यमुना यमराजावर खूप प्रेम करायची ती नेहमी यमराजांना आपल्या घरी त्याच्या मित्रांसोबत जेवायला ये असे निमंत्रण देयची. आपल्या कामात व्यस्त असलेले यमराज सतत हा बेत पुढे ढकलत राहिले. कार्तिक शुक्ल प्रतिपदेचा दिवस आला आहे. या दिवशी यमुनेने यमराजाला पुन्हा भोजनासाठी बोलावले पण यावेळी आपल्या घरी येण्याचे वचन घेतले.

हेही वाचा: Diwali Beauty Tips 2022 : दिवाळीत चमकदार त्वचेसाठी घरगुती ब्युटी टिप्स

यमराजाला वाटले की मी जीव हरणारा देव आहे कोणीही मला त्यांच्या घरी बोलावू इच्छित नाही. माझी बहीण ज्या सद्भावनेने मला हाक मारतो आहे आणि तिच्याकडे जाणे हे माझे कर्तव्य आहे. बहिणीच्या घरी येताना यमराजांनी नरकात राहणाऱ्या जीवांना मुक्त केले. यमराज आपल्या घरी येताना पाहून यमुनेच्या आनंदाला पारावार उरला नाही. आंघोळ करून पूजा करून त्यांना जेवण वाढले त्यांचे आदरतिथ्य केले. यमुनेने केलेल्या पाहुणचाराने प्रसन्न झालेल्या यमराजाने बहिणीला वरदान मागण्याची आज्ञा केली.

हेही वाचा: Diwali 2022 : "एक दिवाळी अशीही गेली..." Rupali Thombare Patil यांच्या पतीने सांगितला तो किस्सा

यमुना म्हणाली की दादा ! तुम्ही दरवर्षी या दिवशी माझ्या घरी याल. आणि माझ्याप्रमाणेच या दिवशी आपल्या भावाशी आदराने वागणाऱ्या बहिणीला तुमच्यापासून कधीही भय नसेल. तुम्ही तिच्या भावाचे नेहमी रक्षण कराल. यमराजांनी 'तथास्तु' म्हणत अमूल्य वस्त्रे यमुनेला दिली आणि यमलोकासाठी मार्गक्रमण केले.या दिवसापासून उत्सवाची परंपरा सुरू झाली. आदरातिथ्य स्वीकारणाऱ्यांना यमाची भीती वाटत नाही, असे मानले जाते. त्यामुळे भाऊबीजेला यमराज आणि यमुना यांची पूजा केली जाते.

हेही वाचा: Diwali Festival 2022 : दिवाळीनिमित्त बाजारपेठ गर्दीने फुलली!

पूजा मुहूर्त

यावर्षी २६ ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. भाऊबीजेसाठी पूर्ण दिवस शुभ आहे पण त्यातल्या त्यात शुभ मुहूर्त दुपारी ०१:१८ ते ०३.३३ मिनिटापर्यंत आहे.

हेही वाचा: Diwali 2022 : पाहा या बॉलिवूड अभिनेत्रींचे दिवाळी स्पेशल लूक

पूजा पद्धत

सकाळी उठून आंघोळ करून तयार व्हा. सर्व प्रथम, दोन्ही बहिणी आणि भाऊ मिळून यम, चित्रगुप्त आणि यमाच्या दूतांची पूजा करतात आणि सर्वांना अर्घ्य देतात. यानंतर, बहीण आपल्या भावाचे औक्षण करते आणि भावाच्या तळहातावर ती सिंदूर, सुपारी आणि सुके खोबरेही ठेवते. त्यानंतर भावाच्या हातावर कलवा बांधून त्याचे तोंड गोड करते. यानंतर बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो.