Diwali facts 2022 : दिवाळीच्या या रोचक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali facts 2022 : दिवाळीच्या या रोचक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

Diwali facts 2022 : दिवाळीच्या या रोचक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

पुणे : दिवाळी हा आनंदाचा उत्सव आहे. लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला या उत्सवाची ओढ असते. या उत्सवादरम्यान, अनेक प्रथा-परंपरा प्रचलित आहे. लहान मुलांसाठी तर हा सण पर्वणी म्हणजे पेक्षा कमी नाही. भारतातसह जगभरात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी प्रभू राम वनवास संपवून अयोध्येला परतले. एव्हढीच माहिती तुम्हाला दिवाळीबद्दल असेल.

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो. पण आपल्याला केवळ हा सण सजावट, मिठाई, लक्ष्मीपूजन आणि फटाके हेच लक्षात येते. त्यामुळे आज दिवाळीशी संबंधित काही रोचक गोष्टी जाणून घेऊयात.

माता लक्ष्मी घालते प्रदक्षिणा

दिवाळीआधीच सर्वजण साफसफाईला सुरुवात करतात. कारण दिवाळीत माता लक्ष्मीची या दिवशी पूजा केली जाते. पण, फार कमी लोकांना माहित असेल की या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीला प्रदक्षिणा घालते. ज्या घरी स्वच्छता असेत तिथे ती जाते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालते.

नरक चतुर्थी

दिवाळी झाल्यावर छोटी दिवाळी असते. त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. याच दिवशी नरकासुराने बंदी बनवलेल्या 16 हजार गोपिकांचीही सुटका केली होती. त्यामुळे त्या दिवाळीला नरक चतुर्थी म्हणूनही ओळखतात.

दिवाळीला फटाके नव्हते

दिवाळीला इर्षेवर फटाके फोडले जातात. फटाके लहानग्यांचा आनंद द्विगुणीत करतात. पण एक काळ असा होता की जेव्हा फटाके फोडणे सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नव्हते. त्यामुळे केवळ श्रीमंत लोक, राजे महाराजे फटाके फोडत होते.

गुरु हरगोविंदजींची सुटका

मुघल शासक जहांगीर याने गुरु हरगोविंदजी यांच्यासह अनेक हिंदू राजांना कैद केले होते. दिवाळीच्या सणालाच गुरु हरगोविंदजी यांची ग्वाल्हेरमधून सुटका झाली होती. त्यामुळे शिख धर्मियांमध्ये दिवाळीला विशेष महत्त्व आहे.

दिवाळी पोहोचली परदेशात

दिवाळी हा सण भारतातच नाही तर परदेशातही साजरा केला जातो. इंडोनेशिया, मलेशिया, फिजी, कॅनडा आणि मॉरिशसस अमेरिका यांसारख्या देशांतील लोकही दिवाळी साजरी करतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनीही व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती. त्यांचे फोटो व्हायरलही झाले होते.