Diwali Faral history : हडप्पा संस्कृतीच्या काळातही लाडू बनवले जायचे

Ladoo
LadooSakal

घराघरात आज चकली, चिवडा, लाडूचा घमघमाट सुटला आहे. गृहिणी फराळ बनवण्यात आणि घरातील पुरूष सजावट करण्यात व्यस्त आहेत. पाहुणे मंडळी घरी फराळ द्यायला यायला सुरूवात झाली की फराळाचे भरलेले ताट समोर येते. या ताटातील गोल आणि गोड पदार्थ म्हणजे लाडू. यामध्ये अनेक प्रकारचे लाडू आहेत. हा लाडू आपल्याकडे कसा आला. त्याचा इतिहास काय सांगतो याबद्दल जाणून घेऊयात.

हडप्पा संस्कृतीतही सापडले पौष्टीक लाडू

बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेस (बीएसआयपी), लखनऊ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) नवी दिल्ली यांनी संयुक्तपणे केलेला हा रिपोर्ट 'जर्नल ऑफ आर्किओलॉजिकल सायन्समध्ये पब्लिश झाला आहे. त्या रिपोर्टनुसार हडप्पा संस्कृतीत 4000 वर्षापूर्वी लाडू बनवले जायचे. 2017 मध्ये राजस्थानमधील बिंजोरजवळील संशोधन सुरू असताना तांब्याचे भांडे सापडले. त्यामध्ये एकसारख्या आकाराचे सात लाडू ठेवलेले होते. ते लाडू ज्वारी, गहू, चणे आणि मूंग डाळ यांपासून बनवलेले होते, अशी माहिती BSIP चे ज्येष्ठ संशोधक राजेश अग्निहोत्री म्हणाले.

Ladoo
Viral Video: स्वच्छतेपुढे भितीनेही मानली हार! या महिलेचा व्हिडिओ पाहाच

आम्हाला वाटले होते की नदीच्या किनाऱ्याजवळ उत्खनन केल्यावर हे लाडू सापडले. त्यांचा आकार आणि आकार पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो होतो. कारण ते मानवनिर्मित होते हे स्पष्टपणे दिसत होते. आम्हाला सुरुवातीला वाटले की, ते लाडू मांसाहारी असतील. पण ते ऍनर्जी देणारे पौष्टीक लाडू होते. हे लाडू कुजले किंवा सडले नाहीत कारण ते एका तांब्याच्या भांड्यात सुरक्षित होते. त्यामुळे ते कशापासून बनवले गेले आहेत हे पाहता आले, असेही त्यांनी सांगितले.

पूर्वीच्या काळात डॉक्टर, हॉस्पिटल नव्हते. त्यावेळी रूग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्य घरोघरी जायचे. तेव्हा काढा, औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती यांनी औषधे बनवली जायची. काहीवेळा औषधाची चव बदलण्यासाठी तयार केलेली देताना त्यामध्ये गूळ किंवा मध टाकून त्याचा गोळा तयार करत असे. जेणेकरून औषधे खाल्ली जावीत.

Ladoo
Pune: चेंबर साफ करणाऱ्या तीनही कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

भारतात अनेक ठिकाणी देवाचा प्रसाद म्हणून लाडू बनवले जातात. तिरूपती देवल्थान समितीतही प्रसाद म्हणून लाडू वाटप करतात. तिथे दिवसाला तब्बल १५०००० इतके लाडू बनवले जातात. या लाडवाला श्रीवरी, पुट्टु असेही म्हंटले जाते. लाडवांच्या लोकप्रियतेमुळे आणि स्वादिष्ट चवीमुळे तिरुपती देवस्थानला २००९ साली पेटंट सुद्धा मिळाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com