Diwali Rangoli 2022 : तुम्हाला माहितीये, रांगोळीची परंपरा हडप्पा संस्कृतीपासून!

रांगोळी काढण्यामागे प्राचीन परंपरा आणि काही धार्मिक, ऐतिहासिक कारणं आहेत. रांगोळीची परंपरा हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहे, असं मानलं जातं.
Diwali Rangoli 2022
Diwali Rangoli 2022esakal

History of Rangoli : कोणताही सण असो वा विशेष दिवस अगदी अंगणापासून ते जेवणाच्या ताटापर्यंत सुंदर नक्षीदार रांगोळी काढून आनंद व्यक्त केलं जातं. रांगोळीला पावित्र्याचं प्रतिक मानलं जातं. शुभ कार्याची सुरूवात रांगोळी काढूनच केलं जाते. त्यामुळे एक मांगल्यमय वातावरण निर्माण होऊन उत्साह संचारतो.

Diwali Rangoli 2022
नवरात्रीत काढा या नऊ रांगोळी...

आपण रोज देवघरासमोर, तुळशीसमोर रांगोळी काढतो. प्रामुख्याने सणासुदीला घराच्या दारापुढे आवर्जून रांगोळी काढली जाते. घराचं प्रवेशद्वार रंगीबेरंगी रांगोळीच्या डिझाइनने सजवलं जातं. सध्याच्या काळात रांगोळी काढण्यासाठी काही हायटेक पद्धतींचाही वापर केला जातो.

Diwali Rangoli 2022
विसर्जनासाठी साकारली साडेतीनशे फुटांची रांगोळी एक हजार किलो गुलाल, दीड हजार किलो पांढरी रांगोळी, २०० किलो रंगांचा वापर

रांगोळी काढण्यामागे प्राचीन परंपरा आणि काही धार्मिक, ऐतिहासिक कारणं आहेत. रांगोळीची परंपरा हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहे, असं मानलं जातं. भारतीय ऐतिहासिक दृष्टिकोनातून असं मानलं जातं, की भारतात रांगोळीचं आगमन मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीशी जोडलं गेलं आहे.

Diwali Rangoli 2022
राजर्षी शाहूंच्या जीवनावर रांगोळी प्रदर्शन

या दोन्ही संस्कृतीत अल्पना याबाबतचे संदर्भ दिसून येतात. वात्स्यायनाच्या कामसूत्रात वर्णन केलेल्या चौसष्ट कलांपैकी अल्पना (रांगोळी) ही कला मानली जाते. रांगोळीचा मोहेंजोदडोशी संबंध असण्याचं एक कारण बंगालच्या आधुनिक लोककलेशी संबंधित आहे.

Diwali Rangoli 2022
बांद्यात रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश

तसंच रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम आणि सीता अयोध्येत परतल्यावर अयोध्येतल्या नागरिकांनी घराच्या दारासमोर रांगोळ्या काढून, दिवे प्रज्ज्वलित करून आनंदोत्सव सुरू केला होता. त्यामुळे दिवाळीला दिव्यासह रांगोळीला विशेष महत्त्व दिलं जातं. पूर्वी धान्य आणि पिठाचा वापर करून रांगोळी तयार केली जात असे; मात्र आता रांगोळी तयार करण्यासाठी विविध घटकांचा वापर केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com