

Sakal
Solar Eclipse February 2026 India timing and effects: खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून सूर्य आणि चंद्रग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. यंदा पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी रोजी लागणार आहे. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जातो तेव्हा सूर्यग्रहण होते, ज्यामुळे सूर्यप्रकाश अंशतः किंवा पूर्णपणे अडवला जातो. फेब्रुवारीतील ग्रहण हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, ज्याला सामान्यतः "अग्नीचे वलय" असे म्हणतात.