
वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घरातील वस्तूंची जागा योग्य ठिकाणी आहे?
Vastu Tips: वास्तू शास्त्रानुसार घराची दिशा तसेच घरातील छोट्या मोठ्या गोष्टींची दिशेचा आपल्या जीवनावर अत्यंत प्रभाव पडतो. असं म्हणतात की वास्तू दोष नसला तर घरात धन संपत्तीची कधीही कमतरता नसते. त्यासाठी वास्तु शास्त्राचे काही उपाय करावे. हे उपाय केले की वास्तूदोष नाहीसा होतो. चला तर जाणून घेऊया. (follow these vastu tips bring happiness and money at home)
1. तिजोरीची दिशा अशी असावी..
वास्तु शास्त्रानुसार मौल्यवान वस्तू लॉकर किंवा तिजोरीला दक्षिण पश्चिम मध्ये उत्तर किंवा उत्तर पूर्वेकडे ठेवणे शुभ राहील. असं म्हटले जाते की या दिशेत लॉकर किंवा तिजोरी ठेवली तर घरात धन संपत्तीची कधीही कमतरता राहत नाही.
2. घराच्या या दिशेत ठेवावे एक्वेरियम
वास्तु शास्त्रानुसार घरच्या उत्तर पूर्व दिशा मध्ये पाण्याने भरलेल्या वस्तू ठेवणे शुभ असते. यामुळे घरात सुख संपत्ती असते. घरात नेहमी स्वच्छ एक्वेरियम ठेवावे
3. घराच्या या दिशेत असावी पाण्याची टंकी
वास्तु शास्त्रानुसार उत्तर पूर्व किंवा दक्षिण पूर्व दिशेत नेहमी पाण्याची टंकी असावी. चुकीच्या दिशेने पाण्याची टंकी डोके दुखी किंवा इतर आजारांना निमंत्रण देते.
4. लीकेज ठेवू नये
जर तुमच्या घरी कुठे पाण्याचे लिकेजची समस्या असेल तर लगेच दुरूस्त करा वास्तूशास्त्रानुसार हे घरात खर्चाचे लक्षण असते.
5. या दिशेने असावे बाथरूम
वास्तु शास्त्रानुसार घरामध्ये बाथरूम नेहमी उत्तर पश्चिम किंवा उत्तर पूर्वच्या दिशेने बनवावे. या विरुद्ध दिशेत बाथरूम असल्याने संपत्तीची कमतरता कधीही भासत नाही.
6. घरी लावा मनी प्लांट
वास्तु शास्त्रानुसार मनी प्लांटचे रोपटे लावल्याने घरात समृद्धि राहते. और आणि आजार दुर होतात.
7. घर या रंगाचे असावे
वास्तुशास्त्रनुसार घराचा रंग हा निळा असणे शुभ आहे.