Friendship Day 2026: मैत्रीचा उत्सव! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि मित्रांसाठी खास शुभेच्छा मेसेज...

Celebrating True Friendship: प्रेम, सलोखा आणि परस्पर आदराचा संदेश देणारा खास दिवस! या मैत्री दिनी तुमच्या लाडक्या, जिवलग मित्रांना द्या खास मराठी शुभेच्छा...
Best Wishes & Quotes for Friendship Day 2026

Best Wishes & Quotes for Friendship Day 2026

esakal 

Updated on

Why Do We Celebrate Friendship Day?: मैत्री हे मानवी जीवनातील सर्वात मौल्यवान आणि सुंदर नाते आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) ३० जुलै हा दिवस अधिकृत आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला असला, तरी भारत, अमेरिका आणि मलेशियासह अनेक देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. यंदा २ ऑगस्ट २०२६ रोजी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिनाची सुरुवात १९५८ मध्ये पॅराग्वेमध्ये ‘वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड’च्या माध्यमातून झाली. शांतता, सलोखा आणि परस्पर आदर वाढवण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही चळवळ आज जगभरात एका मोठ्या उत्सवात बदलली आहे. आजच्या दिवशी लोक एकमेकांना मैत्री बँड्स, भेटवस्तू आणि सुंदर संदेश पाठवून आपले प्रेम व्यक्त करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com