

This Year Some of the Solar and Lunar Eclipses Will Be Visible in India 2026
sakal
Eclipse TIming As Per Indian Panchang: भारतीय संस्कृतीत सूर्य ग्रहण, चंद्र ग्रहण, सुतक काळ आणि पंचांग यांना विशेष महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्ट्या ग्रहण ही एक खगोलीय घटना असली, तरी हिंदू परंपरा आणि श्रद्धांनुसार ग्रहणाचा काळ आध्यात्मिकदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. त्यामुळे ग्रहण लागलेल्या काळात पूजा-पाठ, शुभकार्य आणि कोणतंही अन्न खाणं टाळलं जातं.
सूर्यग्रहण तेव्हा घडते, जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो व सूर्यप्रकाश थांबवतो. चंद्रग्रहण ही घटना तेव्हा होते, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते व पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणांचा प्रभाव आपल्या भावना, मानसिक ऊर्जा आणि आरोग्यावरही होतो.
आता पाहूया २०२६ मध्ये होणाऱ्या सूर्य आणि चंद्रग्रहणांची सविस्तर माहिती: