Gudi Padwa 2023 : वर्षभर टेन्शन फ्री आणि आनंदी रहायचा जाणून घ्या मंत्र, गुढीपाडव्याला हे नक्की करा

हिंदू नववर्षाची सुरुवात असणाऱ्या या सणाला फार महत्व आहे.
Gudi Padwa 2023
Gudi Padwa 2023esakal

Gudi Padwa 2023 : हिंदू कॅलेंडरनुसार हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला होते. हिंदू नववर्षाचा आणि इंग्रजी कॅलेंडरनुसारही वर्षातला पहिला सण म्हणून गुढीपाडवा फार महत्वाचा असतो. त्यामुळे हिंदू धर्मात या सणाला फार महत्व आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी काही पूजा विधी केल्यास त्याचा निश्चित फायदाच होतो. त्यामुळे या दिवशी देवतांची पूजा करून काही उपाय केल्याने वर्षभर सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते.

गुढीपाडव्याला काही धार्मिक उपाय केल्यास निश्चित फायदा होईल. ज्याचा तुम्हाला वर्षभर लाभ मिळेल. गुढी पाडव्याला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असा समज आहे. १४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आले. यावेळी त्यांचे स्वागत गुढ्या उभारून करण्यात आले. त्यामुळेच आनंद सोहळा म्हणूनही हा सण साजरा करण्यात येतो. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे वर्षभर आनंदी रहायचं असेल तर हे उपाय करणं अत्यंत उपयुक्त ठरतं.

Gudi Padwa 2023
Gudi Padwa Recipe : पाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत करताय? जाणून घ्या रेसिपी !

गुढीपाडव्याच्या दिवशी करा हे उपाय

  • ब्राह्म मुहूर्तावर उठून स्नान करा. सुगंध, फुले, धूप, दिवी लावून देवाची पूजा करा.

  • पाटावर पांढऱ्या रंगाचे कापड पसरवून त्यावर हळद, कुंकवानी अष्टकेनी कमळ बनवावे. त्यांनतर कमाळावर मध्यभागी ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवून पूजा करावी.

  • गणपतीची आराधना करावी. ‘ओम ब्रह्मणे नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. विधीपूर्वक ब्रह्मदेवाची पूजा करावी.

  • कडुलिंबाच्या पानांची पावडर बनवून त्यात मीठ, हिंग, जिरे, काळी मिरी, साखर घालून सेवन करावे. यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील. शारीरिक वेदना दूर होतात.

  • चैत्र नवरात्रीची सुरवातही याच दिवशी होते. अनेक जण या दिवशी घटस्थापना करून उपवास करतात.

  • चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने समृद्धी, सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com