

Step By Step Method To Hoist Gudi
sakal
Step-By-Step Traditional Method To Hoist Gudi: हिंदू आणि मराठी नववर्षाचा पहिला सण म्हणजे गुढी पाडवा. वसंत ऋतूचे स्वागत करणारा, कापणीच्या हंगामाचा संकेत देणारा हा सण चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये, गुढी उभारणं म्हणजे फक्त परंपरेचं प्रतीक नाही, तर विजय आणि समृद्धीचं सुद्धा प्रतीक मानलं जातं. तसेच गुढी उभारल्यावर घरातील आणि परिसरातील नकारात्मकता दूर होऊन सुख-समृद्धी आणि आनंद निर्माण होतो. त्यामुळे शास्त्रोक्त आणि योग्य पद्धतीने गुढी उभारणं महत्त्वाचं असतं.