
Astrological predictions for the Marathi New Year: हिंदू धर्मात गुढी पाडवा या सणाला खुप महत्व आहे. हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. हा सण चैत्र शुल्क प्रतिपदेला साजरा केला जातो. या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरूवात केली जाते. यंदा गुढी पाडवा ३० मार्चला साजरा केला जाणार आहे. या दिवशी, घराबाहेर 'गुढी' कलश आणि कापडाने सजवलेला ध्वज ठेवला जातो, जो शुभ आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याला सूर्याची किरणे पृथ्वीवर नवीन ऊर्जा आणि उत्साह आणतात म्हणून गुढीपाडवा हा केवळ एक सण मानला जात नाही तर नवीन उर्जेची आणि आशेची सुरुवात मानला जातो. या शुभ मुहुर्तावर कोणत्या राशींना लाभ होणार आहे हे जाणून घेऊया.