Guru Gochar 2023
Guru Gochar 2023 esakal

Guru Gochar 2023 : 12 वर्षांनंतर गुरूचे मेष राशीत संक्रमण, तेव्हा 1 महिना या राशींनी राहा सावध...

मीन राशीनंतर, गुरू पुढील एक महिन्यासाठी स्थिर राहील आणि मेष राशीत गेल्यावर 30 एप्रिल रोजी उदयास येईल

Guru Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या संक्रमणाला खूप महत्त्व दिले जाते. ग्रहांच्या संक्रमणाचा अर्थ एका राशीतून दुसऱ्या राशीत ग्रहांची हालचाल होय. असे मानले जाते की हे संक्रमण आपल्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. या वर्षी, 31 मार्च रोजी गुरू मीन राशीत स्थित होईल आणि 22 एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल. मीन राशीनंतर, गुरू पुढील एक महिन्यासाठी स्थिर राहील आणि मेष राशीत गेल्यावर 30 एप्रिल रोजी उदयास येईल.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून गुरुच अस्त शुभ मानला जात नाही. गुरू ग्रहाच्या अस्तामुळे सर्व प्रकारची शुभ कार्ये समाप्त होतात आणि अनेक राशींवरही त्याचा विशेष प्रभाव पडतो. गुरु ग्रहाच्या अस्तामुळे या राशींच्या कौटुंबिक जीवनात, आरोग्यामध्ये आणि आर्थिक स्थितीत अनेक चढ-उतार दिसून येतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना त्रास आणि अडचणींचा सामना करावा लागेल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यापारी वर्गासाठी गुरु ग्रह मीन राशीत असल्यामुळे वेळ कठीण जाईल. वास्तविक, या राशीचे लोक जे व्यवसाय किंवा भागीदारीत व्यवसाय करतात त्यांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात संतुलन राखण्याची गरज आहे. या काळात या राशीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळावेत.

धनु

मीन राशीत गुरू ग्रह केल्यामुळे धनु राशीच्या लोकांना आरोग्यासंबंधी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या दरम्यान, आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. धनु राशीच्या लोकांनी देखील आपल्या आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे कारण तिची प्रकृती देखील बिघडू शकते. तसेच, जे कोणाशी तरी नातेसंबंधात आहेत त्यांच्यासाठी वेळ थोडा कठीण जाईल.

Guru Gochar 2023
Chaitra Navratri 2023 : नवमीला हवन सामग्रीत ही 1 गोष्ट अ‍ॅड करा, बँक बॅलेंस दुप्पट अन् यश चौपट वाढेल

कन्या

कन्या राशीच्या लोकांना वैवाहिक संबंधात खूप चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी तुम्ही कोणत्याही वादात पडू नका असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, तुमचा तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. या दरम्यान तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

Guru Gochar 2023
Weekly Horoscope : तूळ ते कुंभ या आठवड्यात या राशींनी चुकूनही करू नका ही कामं, नाहीतर...

कुंभ

मीन राशीमध्ये गुरु ग्रहाच्या अस्तामुळे कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या बोलण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तुमचे बोलणे थोडे कठोर असू शकते. ज्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांसोबतचे नाते खराब करू शकता. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे शब्द विचारपूर्वक वापरण्याचा सल्ला दिला जातो. या काळात कोणतीही गुंतवणूक करू नका. अशा वेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. (Horoscope)

Guru Gochar 2023
Horoscope 26 March : या राशींनी आज नवं काम घेताना व्हा सावध, नाहीतर..

मीन

गुरू मीन राशीत अस्त करणार आहे. अशा स्थितीत मीन राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. यासोबतच तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुमच्यावर कामाचा ताणही अधिक असणार आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला कमी वेळ देऊ शकाल. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे की तुम्ही शहाणपणाने पैसे खर्च करा आणि कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा. (Astrology)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com