
Guru Gochar 2025 predictions for zodiac signs: वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरूला ज्ञान, धर्म, संपत्ती, संतती, नशीब आणि प्रगतीचा कारक मानलं जातं. जेव्हा हा शुभ ग्रह, जो सुमारे 13 महिन्यांतून एकदा राशी बदलतो, तो त्याच्या उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याचे शुभत्व अनेक पटीने वाढते.
यंदा 9 जुलै रोजी गुरू मिथुन राशीत संक्रमण करेल आणि ऑक्टोबरमध्ये, गुरू कर्क राशीत अतिचरी वेगाने संक्रमण करेल. ही एक महत्त्वाची ज्योतिषीय घटना आहे. कारण गुरूचे कर्क राशीत आगमन त्याला उच्च स्थानावर स्थापित करते, जिथे तो पूर्ण शक्तीने असतो. यावेळी, गुरूच्या कृपेमुळे पुढील काही राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे.