Guru Purnima 2023: साई बाबांच्या चमत्कारांच्या ‘या’ कथा ऐकून व्हाल हैराण

Shirdi Sai Baba story: अनेकांना आपल्या शिकवणीने आणि ज्ञानप्रबोधनाने योग्य मार्ग दाखवणाऱ्या साई बाबांचे Sai Baba चमत्कारांच्या अनेक कथा प्रचलित आहेत
Guru Purnima 2023
Guru Purnima 2023Esakal

Shirdi Sai Baba story: शिर्डीच्या साई बाबांचे Sai Baba महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात भक्त आहे. सबका मालिक एक हे साईंचे बोल आपणा सर्वांना ठाऊक आहेत. साईंनी जात, धर्म, पंथ, श्रीमंती आणि गरीबी असा कोणताही भेदभाव न करता गरजूंना मदत केली. अनेकांना संकटातून आणि अंधःकारातून प्रकाशाची वाट दाखवली. Guru Pournima 2023 Know The Miracles of Sri Saibaba of Shirdi

अनेकांना आपल्या शिकवणीने आणि ज्ञानप्रबोधनाने योग्य मार्ग दाखवणाऱ्या साई बाबांचे Sai Baba चमत्कारांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. साई बाबांनी त्यांच्या चमत्कारांनी अनेकांना धडा शिकवला तर काहींना योग्य ती शिकवण दिली. यातील साई बाबांच्या चमत्कारांच्या काही कथा ऐकून तर तुम्ही हैराण व्हाल.

पाण्याने पेटवले दिवे- साई बाबा हे कोणत्याही एका धर्मात विश्वास करायचे नाही. कधी ते मंदिरात Temple झोपायचे तर कधी मशिदीत Masjid. साई बाबा कायम मशिदीमध्ये दिवा लावायचे. यासाठी ते वाण्यांकडून तेल मागत. मात्र एके दिवशी वाण्यांनी साईंना तेल देण्यास नकार दिला. तेल संपलं असल्याचं खोट कारण त्यांनं दिलं. यावर साई बाबा काही न बोलता तिथून निघून गेले आणि त्यांनी मशिदीतील दिव्यांमध्ये पाणी ओतून दिवे पेटवले.

साईंच्या चमत्काराने हे दिवे चक्क पेटले. बघता बघता ही बातमी सर्वत्र पसरली. त्यानंतर साईंना नकार देणारी वाणी देखील तिथे पोहचला आणि तो साईंना शरण गेला. त्यांनं साईंची माफी मागितली. ‘आता पुन्हा कधीच खोट बोलू नका’ केवळ एवढं वाक्यचं साई बाबा त्या वाण्यांला म्हणाले.

हे देखिल वाचा-

Guru Purnima 2023
Shirdi Sai Baba : साईबाबांचे हे विचार आणतील आयुष्यात सुख-समृद्धी

साईंना दिसायचं भविष्य- म्हाळसापती हे साईंचे मोठे भक्त होते. म्हाळसापतींमुळेच खरं तर त्यांना साई हे नाव मिळालं होतं. ज्यावेळी म्हाळसापती यांना पूत्रप्रात्पी झाली तेव्हा ते मुलाला घेऊन साई बाबांकडे गेले. म्हाळसापतींनी साईंना मुलाचं नामकरण करण्यास सांगितलं.

म्हाळसापतीच्या मुलाला पाहून साई बाबा म्हणाले की मुलावर जास्त जीव लावून राहू नका. केवळ २५व्या वर्षापर्यंत त्याच्याकडे लक्ष द्या. हे ऐकून खरं तर म्हाळसापती प्रश्नात पडले आणि ते तिथून निघून गेले.

मात्र जेव्हा म्हाळसापतींच्या मुलाचं २५ वर्षी निधन झालं तेव्हा त्यांना २५ वर्षांपूर्वी साई बाबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. याचाच अर्थ साईंना त्या मुलाचं भविष्य अर्थात त्याच्या मृत्यूची आधीच कल्पना आली होती.

साई बाबांनी ३ दिवसांसाठी केला शरीराचा त्याग- एकदा साई बाबांनी चक्क ३ दिवसांसाठी शरीर सोडलं होतं. एके दिवशी साई बाबांनी त्यांचे भक्त असलेल्या म्हाळसापतींना बोलावून घेतलं. जर मी ३ दिवसात परत आलो नाही, तर माझं शरीर अमुक ठिकाणी दफन कर असं त्यांनी म्हाळसापतींना सांगून ठेवलं होतं.

३ दिवस तुला माझ्या शरीराचं रक्षण करायचं आहे असं त्यांनी म्हाळसापतींना सांगितलं आणि त्यांनी डोळे मिटले. हळू हळू त्यांची श्वसनक्रिया बंद झाली. शरीराची हालचाल थांबली. साईंचं निधन झालं असं अनेकांना वाटलं. वैद्य आणि डॉक्टरांनी त्यांना तपासलंही.

मात्र म्हाळसापतींनी सगळ्यांना साई बाबांपासून दूर राहण्यास सांगितलं. साईंच्या शरीराचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं ते म्हणाले. यावर गावकरी म्हाळसापतींवर नाराजही झाले. ३ दिवस म्हाळसापतींनी साई बाबाचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन जागरण केलं.

३ दिवसांनी साई बाबांनी पुन्हा शरीर धारण केलं आणि सगळे गावकरी थक्क झाले. तर साई भक्तांमध्ये आनंद पसरला.

हे देखिल वाचा-

Guru Purnima 2023
Sai Baba Mantra: गुरुवारी करा साईबाबांच्या 'या' मंत्राचा जप, पैशाचा पडेल पाऊस

साईंचा महिमा- एकदा एक डॉक्टर आपल्या साईभक्त मित्रासोबत शिर्डीमध्ये आले होते. यावेळी डॉक्टरांनी आपल्या मित्राला तूच दर्शनासाठी जा, मी येणार नाही असं सांगितलं. मी केवळ श्रीरामाचा भक्त असून इतर कुणासमोरही आणि खास करून एखाद्या मशिदीत नतमस्तक होणार नाही.

यावर डॉक्टरच्या मित्राने केवळ तू सोबत चल कुणालाही नमस्कार करण्याची गरज नाही असं म्हणत डॉक्टरसह शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनाले ते पोहचले. साईं समोर डॉक्टर जाताच आश्चर्य घडलं. सर्व प्रथम डॉक्टर पुढे आले आणि त्यांनी साईंना वाकून वंदन केलं. हे पाहून इतर सर्व आश्चर्यचकित झाले .

यावर डॉक्टर म्हणाले त्यांना साईंच्या स्थानी श्रीरामाचं दर्शन झालं आणि म्हणूनच त्यांनी वंदन केलं. हे इतरांना सांगत असतानाच त्यांना पुन्हा साई मूळ रुपात दिसले. यावर डॉक्टर भारावून गेले. त्यांना साईंचा महिमा लक्षात आला आणि त्यांनी साईंच्या चरणीचं आश्रय घेतला.

साई बाबांच्या चमत्कारांचे असे अनेक अनुभव त्यांच्या भक्तांना आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com