
थोडक्यात
गुरु पौर्णिमेच्या दिवशी गजकेसरी व मालव्य राजयोग निर्माण होत असून, काही राशींना आर्थिक लाभ आणि वैभव प्राप्त होण्याची शक्यता आहे.
मिथुन, सिंह, तुला आणि मकर राशींना या विशेष योगांमुळे करिअर, नोकरी व वैयक्तिक जीवनात सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळतील.
गुरू पूजन, जप आणि दान धर्म केल्यास या योगांचे फळ अधिकाधिक लाभदायक ठरेल.
Guru Purnima 2025 astrology prediction for all zodiac signs: आज देशभरात गुरु पौर्णिमा साजरी केली जात आहे. सूर्य आणि गुरु एकत्रितपणे मिथुन राशीत गुरु आदित्य राजयोग निर्माण करत आहेत. यासोबतच चंद्रावर गुरुची दृष्टी गजकेसरी राजयोग निर्माण करत आहे. याशिवाय शुक्र स्वतःच्या वृषभ राशीत असल्याने मालव्य राजयोग निर्माण होत आहे. यासोबतच इंद्र योगसह तयार होत आहे. या सर्व दुर्मिळ राजयोगाचा पुढील पाच राशींवर कोणता परिणाम होणार आहे हे जाणून घेऊया.