Happy Married Tips : सासू सुनेच्या भांडणात होतायत पतीचे हाल; या उपायांनी घरात राहील शांतता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Happy Married Tips :  सासू सुनेच्या भांडणात होतायत पतीचे हाल; या उपायांनी घरात राहील शांतता

Happy Married Tips : सासू सुनेच्या भांडणात होतायत पतीचे हाल; या उपायांनी घरात राहील शांतता

सासू सुनेचे नाते हे नाजूक आणि अति संवेदनशील असते. या नात्यात एकदा खटका उडला की, भांडणांची मालिका सुरू होते. मुलाच्या लग्नानंतर नव्या दिवसात सुनेचे भरभरून कौतुक करणारी सासू, आणि सून सर्वत्र पहायला मिळते. पण, एकमेसांसोबत २ महिने घालवले की, वाद सुरू होतात. या दोघींच्या भांडणात बिचाऱ्या पतीचे मात्र हाल होतात.

हेही वाचा: Married Life Tips : आई अन् बायकोच्या भांडणाला वैतागलात? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

असे म्हणतात की सासू सुनेचे नाते सांभाळणे ही दोघींची जबाबदारी आहे. पण, हे नाते बिघडण्यामागे काही शास्त्रीय कारणेही असतात. सासू सुनेचे असो किंवा इतर कोणासोबतही घरात वाद होणे म्हणजे घरात काहीतरी बिघाड झालेला असतो.

हेही वाचा: Married life Tips : वैवाहिक जिवनाला कंटाळलाय? या टीप्सने नात्यात येईल धमाल

लग्नानंतर मुलाला आणि सुनेला बोलतात की, तूम्ही बदलला आहात. पण, वेळेनुसार, काळानूसार बदल हा होतोच. आणि तो स्विकारणे घरातील सदस्यांना अवघड जाते. त्यामुळे वाद होतात. त्यावर काय उपाय करता येतील हे पाहुयात.

हेही वाचा: Diwali Happy Ration Scheme : आनंदाचा शिधा झाला ‘कडू’; साखरच ‘गायब'!

भगवान विष्णू करतील मदत

जर तुमच्या घरात विनाकारण कोणाचीही भांडणे होतात. तूम्ही त्याला कंटाळले असाल तर दररोज सकाळी लवकर स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. भगवान विष्णूची उपासना केल्याने पती-पत्नींमधील प्रेम वाढते.तसेच, तूमचे सासू-सासऱ्यांसोबतचे नातेही दृढ होते.

हेही वाचा: Happy Birthday : महानायकाबद्दल न ऐकलेली गोष्ट ऐकाच

तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा

सकाळी स्नान करून तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतर ‘ओम नमः भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. या उपायाने तुमच्या पतीसोबतचे नाते तर घट्ट होईल. शिवाय सासू,सासरे यांच्याशी मतभेद होणार नाहीत. सकाळी तूळशीच्या सानिध्यात राहील्याने आरोग्यासही फायदा होतो आणि मनही प्रसन्न होते. तुळशीसमोर एखादी इच्छा व्यक्त केल्याने ती पूर्ण होईल. तसेच, तुमच्या घरात सुख-समृद्धी येईल.

सुर्यदेवाला पाणी अर्पण करा

सकाळी आंघोळीनंतर एका भांड्यात पाणी घ्यावे. त्यात थोडी हळद टाकावी. ते पाणी सुर्यदेवाला अर्पण करावे. या उपायाने घरातील कहल संपतील. तसेच सासू-सासऱ्यांसोबतच्या नात्यातही गोडवा वाढेल. या उपायाची सुरूवात गुरूवारी करण्यास सांगितली आहे.

हेही वाचा: Married life : ही योगासने केल्यास पुरुषांचे वैवाहिक आयुष्य होईल समाधानी

पाण्यात चांदीचा तुकडा टाका

घरातील पिण्याच्या पाण्यात चांदीचा एक छोटा तुकडा टाका. जर तुमच्याकडे चांदीचा तूकडा नसेल तर तुम्ही चांदीचे नाणेही वापरू शकता. तो चांदीचा तुकडा नेहमी पाण्यात ठेवावा आणि तेच पाणी स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी वापरा. चांदी हे चंद्राचे प्रतीक असून चंद्राचा गुणधर्म शांत आहे. त्यामुळे घरातील लोकांची तापलेले डोके शांत करण्यात हे पाणी जास्त मदत करेल.