Diwali Happy Ration Scheme : आनंदाचा शिधा झाला ‘कडू’; साखरच ‘गायब'!

Anandacha Shidha news
Anandacha Shidha newsesakal
Updated on

जळगाव : राज्य शासन रेशन दुकानामार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त ‘दिवाळी किट’ (आनंदाचा शिधा) शंभर रुपयांत देत आहे. मात्र दिवाळी किट वाटपातील घोळ मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. कधी रेशन दुकानावर पिशव्या येत नाहीत, कधी पामतेल, साखर पोचत नसल्याचे प्रकार घडत आहेत.

मंगळवारी (ता. २५) तर शहरातील काही रेशन दुकानांवर साखर असूनही ती ‘गायब’ झाल्याच्या तक्रारी शिधापत्रिकाधारकांनी केल्या. यामुळे आनंदाचा शिधावाटप योजना वांध्यात सापडली आहे. शहरातील अनेक रेशन दुकानांतून मंगळवारी साखर न मिळाल्याने शिधापत्रिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. (Sugar missing in state government Diwali Happy Ration Scheme at jalgaon news)

राज्यात सत्तांतर झालेल्यानंतर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना शासनाकडून नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो हरभराडाळ, एक लिटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा संच (दिवाळी किट) शंभर रुपयांत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आठ दिवसांपूर्वी या किटमधील जिन्नस रेशन दुकानदारांपर्यंत पोचल्या होत्या.

मात्र या योजनेचे लाभार्थी सहा लाख २० हजार अन् पिशव्या आल्या आहेत केवळ ४२ हजार. त्यानंतर पिशव्यांअभावी दिवाळी किटची वाटप रखडले होते. नंतर पिशव्या आल्या. मात्र कधी साखर, कधी तेल आलेल्या नसल्याच्या तक्रारी रेशनकार्डधारकांनी केल्या. यामुळे काही लाभधारकांना दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा मिळू शकला आहे.

शहरातील अनेक रेशन दुकानांतून मंगळवारी साखर मिळत नव्हती. केवळ रवा, हरभराडाळ, पामतेल अशा वस्तू दिल्या जात असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. केवळ तीन वस्तू घेऊन जा, असे रेशन दुकानदार सांगत आहेत.

Anandacha Shidha news
Nashik : शहरात धावणार Electric Bus; NMCचा केंद्र शासनाला पुन्हा प्रस्ताव

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानात दिवाळीपूर्वी जाऊन ई-पॉस मशिनवर आपला अंगठा प्रमाणित करून शिधाजिन्नस संच प्राप्त करून घ्यावयाचे आहेत. असे असताना केवळ तीनच वस्तू मिळत असून, ई-पॉस मशिनवर अंगठाही घेत आहेत. मग साखरेचे काय? साखर गायब करण्यात आली आहे, असे रेशन कार्डधारकांनी सांगितले.

याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना विचारले असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. रेशन दुकान संघटनेचे अनिल अडकमोल यांना याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Anandacha Shidha news
Nashik : Electric Audit कागदावरच; Mahavitaran कंपनीकडून प्रतिसाद नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com