
Happy Gudi Padwa Marathi Wishes Message : गुढीपाडवा, हा फुललेल्या वसंत ऋतूचा आणि हिंदू नववर्षाचा प्रारंभ असलेला एक खास सण आहे. 2025 मध्ये गुढीपाडवा 29 मार्चला म्हणजेच उद्या साजरा केला जाईल. हा दिवस आपल्या जीवनात नवा उमेद, नवी आशा आणि नवा उत्साह घेऊन येईल. गुढीपाडवा म्हणजेच फाल्गुन महिन्याचा शेवट आणि चैत्र महिन्याचा प्रारंभ तसेच मराठी लोकांसाठी असलेला सर्वात महत्त्वाचा सण.
गुढीपाडवा साजरा करण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गुढी उभारणे. घराच्या उंबरठ्यावर उभी केलेली गुढी. या गुढीची रंगबिरंगी साडी, रेशमी वस्त्र, तांब्या,कडूलिंबाची पाने आणि साखरमाळ. गुढी उभारणे म्हणजेच नवीन वर्षाच्या स्वागताची आणि प्रत्येकाच्या जीवनात नवा प्रारंभ घडवण्याची एक कृतज्ञता आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी घराघरात पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. या सणाच्या दिवशी नेहमीच पुरणपोळी, खीर, पुरिभाजी आणि अनेक खास पदार्थ घरांमध्ये तयार केले जातात. या पदार्थांचा स्वाद घेऊन लोक गुढीपाडवाचा उत्सव अधिक गोड करतात.
आपल्या प्रियजनांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा पाठवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही कास संदेश सुचवले आहेत. या शुभेच्छा केवळ नवा वर्षाचा प्रारंभ दर्शवतात, तर आपल्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि ऐतिहासिक परंपरांचा सन्मानही व्यक्त करतात. आम्ही दिलेल्या खास गुढीपाडव्याचे संदेश दिले आहेत जे तुम्ही तुमच्या मित्र-परिवाराला पाठवू शकता.
पाडव्याची नवीन पहाट घेवून येवो तुमच्या जीवनात सुखाची लाट.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमचं जीवन आनंद, समृद्धी आणि यशाने भरले जावो.
उभारुन आनंदाची गुढी द्वारी,
जीवनात येवो रंगत न्यारी.
पूर्ण होवोत तुमच्या इच्छ-आकांक्षा,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
जल्लोष नवं वर्षाचा,
मराठी अस्मितेचा,
हिंदू संस्कृतीचा,
सण उत्साहाचा.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडवा केवळ एक सण नाही तर तो आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि समृद्धतेचा उत्सव आहे. हे नववर्ष आपल्यासाठी आनंद, प्रेम आणि यश घेऊन येवो आणि जीवनात नवा उजाळा घेऊन येवो. चला, या गुढीपाडव्याला एक नवीन सुरुवात करूया आणि तुमच्या प्रियजनांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छांनी त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरा.
आपल्या प्रत्येक क्षणात आनंद, समृद्धी आणि सुख असो! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.