Hartalika pooja | कोणत्या रंगाचे कपडे घालून कराल हरतालिका व्रत ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hartalika pooja

Hartalika pooja : कोणत्या रंगाचे कपडे घालून कराल हरतालिका व्रत ?

मुंबई : पतीच्या दिर्घायुष्यासाठी विवाहित महिला तर चांगला पती मिळावा यासाठी कुमारिका हरतालिकेचे व्रत करतात. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत असते. कोणी निर्जळ तर कोणी एक फळ खाऊन हा उपवास करतात. जसे नवरात्रीमध्ये ९ रंगांना महत्त्व असते. अगदी तसेच हरतालिकेचे व्रत करताना कोणत्या रंगाचे कपडे घालावे याबद्दल जाणून घेऊ या.

यावर्षी ३० ऑगस्टला म्हणजे उद्या हरतालिका व्रत आहे. २९ ऑगस्टला दुपारी ३ वाजून २१ मिनिटांनी हरतालिका तिथी सुरु होईल. तिथीनुसार हस्त नक्षत्र ३० तारखेला रात्री ११: ५० पर्यंत असणार आहे म्हणूनच ३० ऑगस्टला हरतालिका व्रत पार पडेल.

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : गणपतीचं लग्न कसं झालं माहितीये का ?

रास आणि जन्मतारखेवरून यावर्षी व्रत करणाऱ्या महिलांनी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत याचे काही नियम शास्त्राने सांगितले आहेत.

जन्मतारखेवरून रंग

१, १०, १९ व २८- लाल, गुलाबी, केशरी

२, ११, २० व २९- सफेद आणि क्रीम

३, १२, २१ व ३०- पिवळा व सोनेरी

४, १३, २२ व ३१- थोडे चमचमणारे रंग, सोनेरी, चंदेरी

५, १४ व २३ – हिरवा

६, १५ व २४- आकाशी नीला

७, १६ व २५ – राखाडी

८, १७ व २६- राखाडी व निळा

९, १८ व २७- लाल, गुलाबी व केशरी

राशीप्रमाणे रंग

मेष- लाल, गुलाबी, वृषभ – क्रीम, मिथुन- हिरवा,कर्क- फिकट पिवळा किंवा क्रीम,सिंह- लाल, गुलाबी, सोनेरी,कन्या- फिकट हिरवा,तूळ- क्रीम, आकाशी निळा,वृश्चिक- लाल, गुलाबी, सोनेरी,धनु- सोनेरी, पिवळा,मकर- राखाडी,कुंभ- फिकट निळा, राखाडी, मीन- पिवळा

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : कुठे पाहाल मुंबईतील महत्त्वाचे गणपती ? जाणून घ्या प्रसिद्ध गणेश मंडळे

हरितालिका व्रताची कहाणी

दक्षकन्या श्यामवर्णा काली हिला शंकराने सर्वादेखत ‘काळी असलीस तरी मला तू खूप आवडतेस’ असे चिडवले. त्यामुळे तिने चिडून हिरवळीवर स्वत:ची हरित सावली फेकली आणि अग्निप्रवेश करून ती हिमालयाची कन्या गौरी म्हणून जन्माला आली.

तिच्या सावलीतून ‘कात्यायनी’ देवी निर्माण झाली. पुढे युद्धात ‘कात्यायनी’ देवीने देवांना मदत केली, ती नंतर ‘हरिकाली’ नावानं ओळखली जाऊ लागली. त्यामुळे भाद्रपद शुक्ल तृतीयेला कासही ठिकाणी हरिकालीचेही व्रत केले जाते.

Web Title: Hartalika Pooja Which Color Clothes Will You Perform Hartalika Vrat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :GaneshotsavHartalika