Hartalika Vrat 2026 Puja Samagri: पहिल्यांदाच हरतालिकेचं व्रत करताय? मग इथे जाणून घ्या पूजेसाठी लागणारे साहित्य अन् संपूर्ण पूजा विधी

Hartalika Vrat First Time Observers: पहिल्यांदाच हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांसाठी येथे पूजेसाठी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी आणि पूजा विधी सोप्या पद्धतीने दिला आहे.
Hartalika Vrat 2026 Puja Samagri and Shiva Parvati Puja Vidhi

Hartalika Vrat 2026 Puja Samagri: Complete Puja Items List for First-Time Vrat Observers

sakal

Updated on

श्रावण महिन्याइतकंच भाद्रपदातील सण-उत्सवांनाही हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. भाद्रपदाची सुरुवात हरतालिका व्रताने होते. भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हे व्रत पाळले जाते. या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकराची श्रद्धेने पूजा केली जाते. विवाहित महिला तसेच मनासारखा वर मिळावा अशी इच्छा असलेल्या कुमारी मुली हे व्रत करतात. धार्मिक श्रद्धेनुसार, हे व्रत केल्याने दाम्पत्य जीवनात प्रेम, सुख आणि समृद्धी टिकून राहते, तसेच अखंड सौभाग्याचे आशीर्वाद मिळतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com