

Hartalika Katha 2026: The Mythological Story Behind Hartalika Vrat You Should Know
sakal
HARTALIKA VRAT STORY IN MARATHI: दरवर्षी भाद्रपद महिन्यातील तृतीयेच्या दिवशी हरतालिका व्रत पाळले जाते. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येणारा हा सण विशेषतः विवाहित महिलांमध्ये श्रद्धेने साजरा केला जातो. काही इच्छुक कुमारीकाही मनासारखा जीवनसाथी मिळावा, या इच्छेने हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार, माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. त्यामुळे हरतालिका व्रत केल्याने मनासारखा जोडीदार मिळतो, अशी श्रद्धा आहे.