Holi 2023 Lucky Colors : तुमच्या राशीनुसार या रंगांनी खेळा होळी, जीवनात मिळेल यश अन् आनंद l holi festival 2023 these zodiac signs play holi with these colors will get happiness and success | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi 2023 Lucky Colors

Holi 2023 Lucky Colors : तुमच्या राशीनुसार या रंगांनी खेळा होळी, जीवनात मिळेल यश अन् आनंद

Holi 2023 Lucky Colors : होळी हा रंगांचा खेळ असं म्हटल्या जातं. होळीच्या सणाला राशीनुसार रंग खेळणे शुभ मानलं जातं. चला तर तुमच्या राशीनुसार तुम्ही कोणता रंग खेळावा ते जाणून घेऊया.

होळी हा सण यंदा आठ मार्चला साजरा केल्या जाणार आहे. या दिवशी लोक सगळे वाद विसरून एकमेकांवर रंग उधळतात. रंगांच्या या सणाला तुम्ही तुमच्या राशीनुसार रंग उधळल्यास तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद पसरेल.

होळीच्या दिवशी केलेल्या उपायांनी घरांमध्ये सुख-समृद्धीसोबतच लक्ष्मी देवीची कृपा राहते. होळी या पवित्र सणात राशीनुसार रंग खेळणे शुभ मानले जाते. राशीनुसार जाणून घ्या, कोणत्या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी कोणता रंग खेळावा ते.

मेष आणि वृश्चिक - दोन्ही राशींचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचा रंग लाल असतो. म्हणूनच या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी लाल, गुलाबी किंवा तत्सम रंग आणि गुलाल वापरावा.

वृषभ आणि तूळ - या राशींचा स्वामी शुक्र आहे. शुक्राचा रंग पांढरा आणि गुलाबी आहे. होळीच्या दिवशी पांढऱ्या रंगाने होळी खेळता येत नाही, त्यामुळे सिल्व्हर रंगही वापरता येतो. यासोबतच गुलाबी रंगानेही होळी खेळता येते.

कन्या आणि मिथुन - या राशींचा स्वामी बुध आहे आणि बुधचा रंग हिरवा मानला जातो. असे म्हटले जाते की हिरव्या रंगाचा वापर विजेत्यांच्या जीवनात आनंद आणि शांती आणेल. हिरव्या रंगाव्यतिरिक्त, या राशीचे लोक पिवळा, केशरी आणि फिकट गुलाबी रंगांनी देखील होळी खेळू शकतात.

मकर आणि कुंभ - या राशींचा स्वामी शनिदेव आहे. शनिदेवाचा रंग काळा किंवा निळा आहे.अशा लोकांसाठी निळा रंग शुभ आहे. काळ्या रंगाने होळी खेळणे शक्य नाही, त्यामुळे निळ्या, हिरव्या किंवा नीलमणी रंगाने होळी खेळू शकता.

धनु आणि मीन - गुरु हा धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. त्यांचा आवडता रंग पिवळा मानला जातो. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. याशिवाय केशरी रंगही वापरता येतो. (Horoscope)

कर्क आणि सिंह - कर्क आणि सिंह राशीचा स्वामी चंद्र ग्रह आहे. आणि या राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाने होळी खेळावी. पांढऱ्या रंगाने होळी खेळणे शक्य नाही, त्यामुळे हे लोक कोणताही रंग घेऊन त्यात थोडे दही किंवा दूध घालू शकतात. दुसरीकडे सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे केशरी, लाल आणि पिवळ्या रंगांनीही होळी खेळता येते. (holi)