Holi 2023 : होळीच्या दिवशी 'हे' काम केल्याने लक्ष्मी होते प्रसन्न, छप्पर फाड होतो लाभ

जर तुम्ही आर्थिक समस्येतून जात असाल तर होळीच्या दिवशी हे काही खास उपाय फायदेशीर ठरू शकतील.
Holi 2023
Holi 2023esakal

Holika Dahan 2023 Astro Tips : प्रत्येकच व्यक्तीला वाटत असतं की, आपल्या आयुष्यात पैशांशी निगडीत समस्या नसाव्या. कुटुंबात भौतिक वस्तूंसह सुख-समृद्धी नांदावी. यासाठीच माणूस दिवसरात्र मेहनत करत असतो. पण काही गोष्टींसाठी नशिब साथ देत नाही तेव्हा आर्थिक ताण सहन करावा लागतो.

जर तुम्हीपण बऱ्याच काळापासून अशा आर्थिक ताणातून जात असाल तर होळीच्या दिवशी पैशाशी निगडीत या समस्या सोडवण्यासाठी काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत.

आर्थिकस्थिती मजबूत करण्यासाठी

आर्थिक ताणातून जात असाल तर होळी पेटवल्यानंतर त्यात नारळात भूसा भरून होळीत अर्पण करावे. यामुळे पैशाच्या समस्या सुटतील.

नोकरी मिळवण्यसाठी

जर बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असाल आणि नोकरी मिळत नसेल तर होळीत नारळ, सुपारी आणि पान अर्पण करावे.

Holi 2023
Holi festival : कोकणासाठी होळी विशेष रेल्वे गाड्या केव्हा सोडणार !

पैसा मिळवण्यासाठी

असे मानले जाते की, होळीची राख एका लहान पिशवीत भरून तिजोरीत ठेवल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. साठवलेल्या धनात वृद्धी होते.

नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी

होळीची राख घरी घेऊन या. त्यात मोहरी आणि मिठ मिक्स करा. स्वच्छ भांड्यात हे भरा. घरातल्या एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवा. या उपायाने नकारात्मक शक्ती दूर होतात. जर वाईट काळ सुरू असेल तर तो ही दूर होतो.

भयमुक्तीसाठी

जर एखाद्या व्यक्तीला चेटूक करण्याची भीती वाटत असेल तर होलिका दहनाच्या भस्माचा टिळक लावल्याने ही भीती दूर होऊ शकते. व्यक्तीचे आत्मबल वाढते.

Holi 2023
Holi Astrology : होळीनंतर होणाऱ्या ग्रहांच्या युतीने या राशींना भोगावा लागणार त्रास

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com