Horoscope 9 Feb 2023 : संकष्टी फळणार; या राशींत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ अन् बरंच काही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope 9 Feb 2023

Horoscope 9 Feb 2023 : संकष्टी फळणार; या राशींत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ अन् बरंच काही

Horoscope 9 Feb 2023 : आज संकष्टी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींना संकष्टी फळणार आहे. तुमच्या राशीत काय काय योग जुळून येणार आहेत ते जाणून घेऊयात.

मेष (Aries)
शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीचा आज तुम्हाला फायदा होणार आहे. आरोग्याच्या तक्रारी दूर होणार आहेत. एखाद्या नव्या कामात पुढाकारानं सहभागी व्हाल. एकंदरीत आज तुमच्या भाग्याला नशिबाची साथ मिळणार आहे.

वृषभ (Taurus )
अतिघाई आणि रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. आज मोठ्या भावाशी शाब्दिक बाचाबाची होईल पण हा वाद मिटवण्यावर भर द्या. आजच्या दिवशी पैसे उधार घेऊ नका. नाहीतर तोट्यात राहाल.

मिथुन (Gemini )
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावं. गणरायाची आराधना करावी. इच्छित फलप्राप्ती होईल. पैशांची उधळपट्टी टाळा. 

कर्क (Cancer )
संपत्तीत नव्यानं भर टाकाल. आज विवाहित महिला एखादा नवा दागिना खरेदी करु शकतात. एखाद्या प्रवासाला जाण्याचा बेत आखू शकता. 

सिंह (Leo )
मोठा प्रवास घडणार आहे. मित्रपरिवार आणि आप्तेष्टांची साथ असेल. अविवाहितांसाठी आज स्थळं येणार आहेत. 

कन्या (Virgo )
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांवर तुमच्या कामाचा प्रभाव असेल. नव्या व्यक्तींना भेटाल, चर्चेतूनच तुमच्या समस्यांवर तोडगा निघेल. 

तुळ (Libra )
एखादी शुभवार्ता मिळणार आहे. आजचा दिवस शुभ आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती करण्याची संधी आहे. आज तुमच्या परागवाढीवर चर्चा होणार आहे. 

वृश्चिक (Scorpio )
नवं वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. अवाजवी खर्च टाळा. येत्या काळात नवं घर घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव आजच्याच दिवसापासून सुरु करा. 

धनु (Sagittarius )
नोकरीमध्ये बढती मिळणार आहे. तुमच्या कामाच्या बळावर तुम्ही मोठे होणार आहात. एखादं वाहन खरेदी करु शकता. 

मकर (Capricorn )
आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आज खास व्यक्तीच्या भेटीनं तुम्ही भारावून जाल. मोठ्यांचे आशीर्वाद आज मदत करतील. 

कुंभ (Aquarius )
नोकरीच्या ठिकाणी काहीतरी नवं शिकण्याची संधी मिळेल. आपल्या माणसांना जपा. आज तुम्हाला पगारवाढीचे संकेत मिळणार आहेत. (Horoscope)

मीन (Pisces )
मित्रांशी वाद घालू नका. कुटुंबात शुभकार्यांची सुरुवात होणार आहे. येणारा काळ अतिशय मंगलमय आहे. 

डिस्क्लेमर - वरील लेख माहितीवर आधारलेला असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.