
dasara news
esakal
आज देशभरात दसरा साजरा होत आहे. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. या पारंपारिक दसऱ्याला आता राजकीय स्वरूप देखील येत आहे. तर शस्त्रपूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील दसऱ्याला असतात. पण छत्रपतींच्या काळात दसरा कसा साजरा होत असेल असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर छत्रपतींच्या काळात दसरा थाटामाटात आणि शिस्तीत साजरा व्हायचा याचं जिवंत चित्र एका ऐतिहासिक पत्रातून समोर आलं आहे. साताराचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या रोजनिशीतील हे पत्र आहे.