
Ramadan 2025: रोजा व नमाज आणि सामुदायिक बंधनाचा महिना रमझान जवळ आला आहे. अनेकजण हा महिनाभर उपवास करतात आणि रोजा व नमाजचे पालन करतात. पण मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या पवित्र महिन्यादरम्यान अधिक काळजी घेण्याची आणि नियोजन करण्याची गरज आहे. योग्य माहितीसह ते त्यांचा उपवास कार्यक्षमपणे पार पाडू शकतात आणि त्यांच्या आरोग्याबाबत चिंता न करता या पवित्र महिन्याच्या रोजामध्ये सहभाग घेऊ शकतात.
पहाटेपूर्वीच्या सुहूरपासून सूर्यास्तनंतरच्या इफ्तारपर्यंत उपवासादरम्यान रक्तातील शर्करेच्या पातळ्या संतुलित राखणे संभाव्य चढ-उतारांमुळे आव्हानात्मक ठरू शकते. म्हणून, सुहूर व इफ्तार महत्त्वपूर्ण भोजन असले तरी त्यामधून ऊर्जा व पोषण मिळणे आवश्यक आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या काळात रक्तातील शर्करेच्या पातळ्यांमधील मोठ्या परिवर्तनांचे व्यवस्थापन करण्यासाठी काळजीपूर्वक आहाराचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.