Krishna Kamala Ekadashi: अधिकामासातील कृष्ण कमला एकादशीचे व्रत कसे करावे?

अधिक श्रावण महिन्यात 12 ऑगस्ट रोजी अधिकामातील कमला एकादशीचे व्रत करण्यात येणार आहे
 Ekadashi 2023
Ekadashi 2023Esakal

Ekadashi : अधिक श्रावण मासामुळे यावेळी श्रावण महिना दोन महिन्यांचा असून, श्रावण महिन्यात येणार्‍या 2 एकादशींसोबतच अधिक मासामुळे इतर 2 एकादशीही येणार आहेत, त्यामुळे या वेळी 4 एकादशी साजरी केली जाणार आहे. अधिक श्रावण महिन्यात 12 ऑगस्ट रोजी अधिकामातील कमला एकादशीचे व्रत करण्यात येणार आहे, ज्याचे पालन केल्याने जीवनात सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते. 

कृष्ण कमला एकादशी पूजा मुहूर्त कोणते आहेत?

एकादशी तिथी प्रारंभ- 11 ऑगस्ट, सकाळी 7 वाजून 36 मिनिटे.एकादशी तिथी समाप्ती - 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटे.12 ऑगस्ट, सकाळी 7 वाजून 28 मिनिटे ते 10 वाजून 50 मिनिटापर्यंत.पराण वेळ - 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 50 मिनिटे. शनिवारी, 12 ऑगस्ट रोजी परमा एकादशीचे व्रत केले जाईल. तर द्वादशी तिथी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजून 30 मिनिटे ते 13 ऑगस्ट सकाळी 8 वाजून 50 मिनिटापर्यंत असेल, म्हणजेच 13 ऑगस्ट रोजी द्वादशी तिथी साजरी केली जाईल.

 Ekadashi 2023
Vegetable Daliya Recipe: नाश्त्यासाठी बनवा चवदार आणि चविष्ट व्हेजिटेबल दलिया..

जाणून बघू या कृष्ण कमला एकादशीचे महत्त्व काय आहे?

परमा एकादशी जी अधिक महिन्यामध्ये येते तिला विशेष महत्त्व आहे कारण ती तीन वर्षांतून एकदा येते. या तिथीला भगवान विष्णूची उपासना केल्याने सुख आणि ऐश्वर्य प्राप्त होते आणि दुःख आणि दारिद्र्य नष्ट होते. त्याच वेळी सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. या एकादशीचे वर्णन दुर्लभ सिद्धी देणारी म्हणूनही केले आहे, म्हणून या एकादशीला परमा एकादशी म्हणतात. या तिथीचे व्रत करून कथा श्रवण केल्याने 100 यज्ञाइतके पुण्य फळ मिळते. शंख, चक्र आणि गदा यांच्यासोबत असलेल्या भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी राहते, असे शास्त्रात सांगितले आहे.

 Ekadashi 2023
Adhik Mahina 2023: धोंडाच्या महिन्यात जावयाला चांदीचे वाण का देतात? 

कृष्ण कमला एकादशी पूजा कशी करावी?

परमा एकादशी व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान व ध्यान करून भगवान विष्णूसमोर हातात अक्षदा व फुले घेऊन व्रत करावे. यानंतर चौरंगावर लाल कपडा पसरवून भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवा आणि पूजेचे साहित्य चौरंगाखाली ठेवा. यानंतर पंचोपचार पद्धतीने पूजा करून नैवेद्य दाखवावा. यानंतर भगवान विष्णूची आरती करा आणि विष्णु सहस्त्रनाम पठण करा. मग दानधर्म करताना फळे खाऊ शकता. संध्याकाळीही पूजा करा आणि नंतर द्वादशी तिथीला पारण करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com