Vegetable Daliya Recipe: नाश्त्यासाठी बनवा चवदार आणि चविष्ट व्हेजिटेबल दलिया..

चविष्ट असण्यासोबतच व्हेजिटेबल दलिया देखील खूप आरोग्यदायी असते.
Vegetable Daliya Recipe
Vegetable Daliya RecipeEsakal
Updated on

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी हलक्या आणि पचणाऱ्या गोष्टी खाणे फायदेशीर ठरते. तुम्ही व्हेजिटेबल दलिया सारख्या हलक्या नाश्त्याने दिवसाची सुरुवात करू शकता. चविष्ट असण्यासोबतच व्हेजिटेबल दलिया देखील खूप आरोग्यदायी असते. बदलत्या हवामानात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सजग असाल तर नाश्त्यात भाजीपाला दलियाचा समावेश करू शकता. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. सकाळच्या बिझी शेड्युलमध्ये ही नाश्त्याची डिश झटपट तयार करता येते. चला जाणून घेऊया व्हेजिटेबल व्हेजिटेबल दलिया कसा तयार करायचा याची सविस्तर रेसिपी..

Vegetable Daliya Recipe
Adhik Maas 2023 : अधिक मासात आलेली संकष्टी का महत्वाची आहे ?

साहित्य

दलिया एक वाटी

एक बटाटा 

एक टोमॅटो 

एक बारीक चिरलेला कांदा  

बारीक चिरलेला गाजर 

एक चमचा आले-लसूण पेस्ट 

दोन चमचे बारीक चिरलेली फुलकोबी   

हळद 

लाल तिखट 

गरम मसाला 

तेल 

मीठ 

Vegetable Daliya Recipe
Boondi Recipe: घरीच बनवा 10 मिनिटांत गोड रसरशीत बुंदी, जाणून घ्या सोपी रेसिपी

कृती:

सर्वप्रथम बटाटे, टोमॅटो, कांदे, गाजर बारीक चिरून घ्यावे. यानंतर, दलिया पॅनमध्ये घ्या आणि मंद आचेवर कोरडे भाजून घ्यावे. आता कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा आणि हलका गुलाबी होईपर्यंत परतावा. यानंतर आले-लसूण पेस्ट घालून परतावे. आता त्यात हळद, लाल मिरची, गरम मसाला आणि इतर गोष्टी घालून सर्व काही दोन ते तिन मिनिटे परतून घ्याले. सर्व मसाले भाजून झाल्यावर कढईत एक एक करून चिरलेल्या भाज्या टाका आणि तळून घ्यावा. बटाटे मऊ झाल्यावर त्यात भाजलेले दलिया आणि अर्धा ग्लास पाणी घालावे. (आवश्यकतेनुसार पाण्याचे प्रमाण वाढवता किंवा कमी करता येते) यानंतर पॅन झाकून ठेवा आणि दलिया दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्यावे. यानंतर गॅस बंद करा. स्वादिष्ट नमकीन व्हेजिटेबल दलिया तयार आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही पॅनऐवजी कुकर वापरू शकता आणि दलिया दोन ते तिन शिट्ट्या होईपर्यंत शिजवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com