
Indira Ekadashi 2025
Sakal
इंदिरा एकादशी 2025 मध्ये महिलांनी पूर्वजांच्या मुक्तीसाठी काही गोष्टी टाळाव्यात.
या दिवशी केस धुणे, तुळशीला पाणी अर्पण करणे, शारीरिक संबंध ठेवणे आणि दुसऱ्याच्या घरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
या नियमांचे पालन केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि कुटुंबाला समृद्धी प्राप्त होते.
Indira Ekadashi 2025 women rules for ancestors liberation: हिंदू धर्मात इंदिरा एकादशीला खुप महत्व आहे. यंदा इंदिरा एकादशी १७ सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. हे व्रत पूर्वजांना जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त करतं अशा मान्यता आहे. भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला या व्रताबद्दल सांगितले होते. या एकादशीचे व्रत आणि पूजा केल्याने भक्ताला अनेक यज्ञांइतके पुण्य मिळते. इंदिरा एकादशीचे व्रत पितृपक्षात येते आणि ते कुटुंबाच्या सुखाशी संबंधित असल्याने, या दिवशी महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.