Janmashtami 2022 Recipe: बाजारात मिळणाऱ्या लोण्याची चव हवीये? मग घरीच ट्राय करा सोपी रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Janmashtami 2022 Recipe: बाजारात मिळणाऱ्या लोण्याची चव हवीये? मग घरीच ट्राय करा सोपी रेसिपी

जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला त्याचे आवडते अन्नपदार्थ नैवेद्याच्या स्वरुपात चढवले जातात.

Janmashtami 2022 Recipe: बाजारात मिळणाऱ्या लोण्याची चव हवीये? मग घरीच ट्राय करा सोपी रेसिपी

मख्खन म्हणजेच लोणी हे श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे असे मानले जाते. कृष्णाचा तो आवडीचा पदार्थ असल्याने त्याला 'मख्खन चोर' असंही म्हटलं जातं. त्यामुळे जन्माष्टमीदिवशी भगवान श्रीकृष्णाला पांढऱ्या लोण्याचा नैवेद्य चढवला जातो.

अवघ्या काही दिवसांवर जन्माष्टमीचा सण येवून ठेपला आहे. अशा परिस्थितीत, जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला त्याचे आवडते अन्नपदार्थ नैवेद्याच्या स्वरुपात अर्पण करण्यासाठी ठेवले जातात. यातील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे लोणी. हे लोणी कसे आणि कधी तयार करावे हे आज आम्ही सांगणार आहोत. तुम्ही ही खाली दिलेली कृती केल्यास काही क्षणांत लोणी तयार होईल आणि त्याला विकत आणलेल्या लोण्याची चवही येईल..

हेही वाचा: Krishna Janmashtami 2022: कृष्ण जन्माष्टमीला का फोडली जाते दही-हंडी?

फ्रेश लोणी कसे बनवावे?

घरी पांढरे लोणी बनवण्यासाठी आपल्याला ताजी मलई लागणार आहे. शक्यतो ही क्रीम घरी तयार केलीली असावी. यासाठी रोज दूध गरम केल्यानंतर त्यावर तयार झालेली थंड मलई काढून बाजूला ठेवा. ही मलई अधिक प्रमाणात असेल तरच पांढरे लोणी बनवू शकतो. ही फ्रोझन क्रीम फ्रीजरमध्ये ठेवा आणि लोणी बनवायचे असेल तेव्हा किमान 6 तास आधी बाहेर काढून घ्या.

पांढरे लोणी कसे बनवायचे

बाजारासारखे पांढरे लोणी बनवण्यासाठी तुम्ही क्रीममध्ये बर्फाचे थंड पाणी घाला आणि नंतर ब्लेंडरच्या मदतीने ३ ते ४ मिनिटे हे मिश्रण एकत्र चांगले मिसळून घ्या. यानंतर 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्हाला बटरचा जाड थर दिसू लागेल. हा थर वेगळा ठेवा. वेगळे केलेले बटर हाताने दाबून पाणी काढून टाका. ते चांगले मिसळा आणि हवाबंद डब्यात ठेवा. हे तयार झालेले लोणी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरच वापरा. श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून चढवण्यासाठी, तुम्ही ते मातीच्या मडक्यात घालून मंदिरात ठेवू शकतो.

हेही वाचा: Janmashtami : गोकुळ अष्टमीला कृष्णाला 'या' 2 पदार्थांचे नैवेद्य; ट्राय करा सोप्या रेसिपी