Jupiter Retrograde 2027
esakal
गुरु ग्रहाच्या राशीतील स्थितीसोबतच त्याच्या चालीलाही विशेष महत्त्व आहे. गुरु सध्या सिंह राशीत असून सरळ गतीने मार्गक्रमण करत आहे. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गुरुच्या चालीत बदल होणार आहे. द्रिक पंचांगानुसार, २५ जानेवारी २०२७ रोजी गुरु वक्री चाल सुरू करून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे कर्क ही गुरुची उच्च रास मानली जाते.