Kaal Bhairav Jayanti
Kaal Bhairav JayantiEsakal

Kaal Bhairav Jayanti: कालभैरव अष्टमी नेमकी कथा काय आहे?

कालभैरव हा भगवान शंकराचा अवतार आहे.
Published on

Kaal Bhairav Jayanti 2022: दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. याला कालाष्टमी  देखील म्हटले जाते. कालभैरव हा भगवान शिवप्रभूंचा एक भाग मानाला जातो. शिवप्रभूंनी कालभैरवाची  काशीचा कोतवाल म्हणून नियुक्ती केली अशी धार्मिक मान्यता आहे. धार्मिक श्रद्धेनुसार कालभैरवाच्या पूजेशिवाय भगवान शंकराचे व्रत अपूर्ण मानले जाते.

आता बघू या कालभैरव अष्टमी नेमकी कथा काय आहे ?

कालभैरव हा भगवान शंकराचा अवतार आहे. ब्रह्म देवाला सृष्टीची निर्मिती केल्याचा प्रचंड अहंकार झाला. अखेर त्याच्या अहंकाराचा इतका अतिरेक झाला होता की तो अहंकार कमी करण्यासाठी कालभैरवाने त्रिशूळाने ब्रह्म देवाचे पाच पैकी एक शिर धडापासून वेगळे केले. आणि या पृथ्वीवर ब्रह्म देवाला पूजेत विशेष महत्त्व दिले जाणार नाही, असा शाप कालभैरवाने त्यावेळी दिला. यामुळेच पृथ्वीवर काही अपवादात्मक जागा सोडल्यास ब्रह्म देवाचे पूजन होत नाही तसेच त्याचे मंदिरही आपल्याला कुठेच दिसत नाही. 

कालभैरवाचा अवतार कसा आहे?

शंकराचा अवतार असलेला कालभैरव हा चार हातांचा आहे. त्याचे दात तोंडाबाहेर आले आहेत. कालभैरवाच्या एका हातात तलवार किंवा फास किंवा साप, दुसऱ्या हातात कवटी, तिसऱ्या हातात डमरू आणि चौथ्या हातात त्रिशूळ आहे. कालभैरवाला दंडपाणि या नावानेही ओळखले जाते. हा शंकराचा अतिशय उग्र आणि घातक अवतार आहे. या अवताराला रुद्रावतार असेही म्हणतात.  अतिशय मोजक्या कपड्यांत वावरणाऱ्या कालभैरवासोबत कुत्रा आणि पर्वत असतात. वाईट वर्तन करणाऱ्या आणि अहंकार बाळगणाऱ्यांना कालभैरव कठोर शिक्षा देतो. जेव्हा सतीने अर्थात पार्वतीच्या सती अवताराने यज्ञ कुंडात उडी मारुन आत्माहुती दिली त्यावेळी भगवान शंकराचा कोप झाला. शंकराने कालभैरव या अवताराला यज्ञस्थळ नष्ट करण्याचा आदेश दिला. साक्षात काळ बनून आलेल्या कालभैरवाने तांडव केले. ज्या ठिकाणी शंकराचे ज्योर्तिलिंग किंवा देवीचे शक्तिपीठ आहे अशा ठिकाणी कालभैरवाचे मंदिर आढळते. यातूनच कालभैरवाचे महत्त्व लक्षात येते.

Kaal Bhairav Jayanti
Tulsi Vivah 2022: तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडासोबत का लावलं जातं ?

कालभैरवाची कृपादृष्टी मनोभावे आराधना कशी केली जाते?

कालभैरवाची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी काल भैरव अष्टमीच्या दिवशी अर्थात काल भैरव जयंती निमित्त उपवास केला जातो. सूर्योदयापासून सुरू होणारा हा उपवास सूर्यास्तानंतर संपतो. उपवास काळात कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणतात. कुत्र्याला खाऊ घालून उपवास सोडतात. काल भैरव अष्टमी किंवा काल भैरव जयंती निमित्त त्या दिवशी 1008 वेळा काल भैरव मंत्राचा मनोभावे जप केला जातो. कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणतात. रात्री जागरण करुन पूजा, आरती, भजन, किर्तन केले जाते. कुत्र्यांना खाऊ घालतात आणि पितरांना श्रद्धांजली वाहतात. 

आता बघू या कालभैरवाष्टक स्तोत्र हे स्रोत पठण केल्यास तुमच्या घरात सदैव सुख शांती आणि समाधान नांदेल.

ॐ देवराजसेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं

व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम्

नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥१॥

भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं

नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ।

कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं

काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥२॥

Kaal Bhairav Jayanti
Winter Tips: हिवाळ्यात उबदार कपड्यांची निगा कशी राखावी?

शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं

श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।

भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं

काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥३॥

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं

भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।

विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥४॥

Kaal Bhairav Jayanti
Winter Tips : हिवाळ्यात दुधात तुळशीचे पाने उकळून पिण्याचे काय आहे फायदे?

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं

कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम् ।

स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥५॥

रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं

नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम् ।

मृत्युदर्पनाशनं कराळदंष्ट्रमोक्षणं

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥६॥

Kaal Bhairav Jayanti
Winter Recipe: चवदार ओल्या कांद्याची चटणी कशी तयार करायची?

अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं

दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् ।

अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥७॥

भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं

काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् ।

नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं

काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥८॥

कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं

ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।

शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं

ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं ध्रुवम् ॥९॥

॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम्॥

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com